![]()
पुण्यात अल्पवयीन मुलींचे गर्भपात करत असल्याची बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी देत एका डॉक्टरकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन पत्रकारांविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय डॉक्टरांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रणव ऊर्फ प्रसाद बोरसे (वय २५) आणि शुभम सौदागर (वय २६) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते मध्यरात्री बाराच्या सुमारास टिंगरेनगर येथील एका हॉटेलमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला संपर्क साधला. त्यांनी डॉक्टरांवर अल्पवयीन मुलींचे गर्भपात करत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला. आरोपींनी डॉक्टरांना धमकी दिली की, ते त्यांच्या क्लिनिकचे नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून दवाखाना बंद पाडतील. तसेच, त्यांना पाच वर्षांची शिक्षा होईल, जामीन मिळण्यास तीन-चार वर्षे लागतील आणि त्यांचे सर्व काही उद्ध्वस्त केले जाईल, असेही म्हटले. या प्रकरणातून वाचण्यासाठी १० लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा सकाळी अटक होईल, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. माने करत आहेत. पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड; खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई परदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानक परिसरात पकडले. या प्रकरणात सराइताच्या साथीदाराला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी वीर श्याम दलगज (वय २२, रा. पारसी चाळ, देहूरोड), सार्थक शिवनागी वाघलगवे (वय २२, रा. पिंपरी) यांना अटक करण्यात आली. दलगजविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. ११ ऑगस्ट रोजी लोहमार्ग पोलिसांचे पथक खडकी रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री गस्त घालत होते. त्या वेळी दलगज हा फलाट क्रमांक एक परिसरात थांबला होता. अंधारात थांबलेल्या दलगज याला पोलिसांना पाहिले. पोलिसांना पाहताच तो पसार झाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पिस्तूल, तसेच सहा काडतुसे सापडली. पिस्तुलाबाबत पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा साथीदार वाघलगवे याने पिस्तूल दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाघलगवे याला ताब्यात घेतले. परदेशी बनावटीचे पिस्तूल कुठून आणले, तसेच त्यांना कोणी दिले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
Source link
डॉक्टरकडे 10 लाखांची खंडणी मागणी, दोन पत्रकारांवर गुन्हा:अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताची बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी दिली