Headlines

Navnath Waghmare Booked in Jalna Over Controversial Statement on Maratha Women


‘ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसतात,’ असे अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर अखेर जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधानावरून राज्यभरात मराठ

.

नेमके काय आहे प्रकरण?

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना थेट नेत्यांच्या घरातील महिलांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते: “स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की, माझी सून मराठा आणि बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे ‘सोयरे’ घुसले असतील. फक्त बावनकुळेच नाही, तर अनेक ओबीसी मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुले आणि पैसा दिसला की मराठा मुली त्यांच्या घरात घुसून लग्न करतात. जर हे मंत्री मराठ्यांच्या मुलींचे ऐकून ओबीसींचे वाटोळे करत असतील, तर त्यांनी समोर येऊन सांगावे, असेही वाघमारे म्हणाले होते.

जालन्यात गुन्हा दाखल; राज्यभरात तीव्र पडसाद

वाघमारेंच्या या विधानामुळे मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी थेट महिलांचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली. जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तक्रार दाखल केली. दोन समाजांत तेढ निर्माण करणे आणि महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचेल असे वक्तव्य केल्याप्रकरणी वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

नांदेडमध्ये ‘सकल मराठा समाजाच्या’ महिलांनी मोठा मोर्चा काढून वाघमारेंच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता. तर सोलापूरच्या माढ्यातही त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने झाली.

वाढत्या वादानंतर वाघमारेंकडून माफीनामा

राज्यभरातून होणारा कडाडून विरोध आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी बॅकफूटवर जात माफी मागितली आहे. “बावनकुळेंवर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ओघात माझ्याकडून हे वक्तव्य गेले. यापूर्वी माझ्याकडून असे कधीही विधान गेले नाही. राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावे आणि पदरात घ्यावे,” असा खेद त्यांनी व्यक्त केला.

मात्र, माफी मागतानाही त्यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाच. “जरांगेंनी छगन भुजबळ, मुंडे बंधू-भगिनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलेल्या शिवीगाळी प्रकरणी ते कधी माफी मागणार?” असा प्रतिसवाल वाघमारेंनी विचारला.

विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया…

‘मराठ्यांच्या लेकींवर बोलाल तर सुट्टी नाही’ – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे यांनी या विधानावर प्रचंड संताप व्यक्त केला. “मी कितीही आक्रमक बोललो, तरी कोणत्याही समाजाच्या महिला किंवा लेकी-बाळींवर कधीच बोलत नाही. तुम्ही मराठ्यांच्या लेकींवर बोलून अत्यंत नीच पातळी गाठली आहे. जो मराठ्यांच्या लेकींवर बोलेल, त्याला यापुढे सुट्टी नाही. तुमचे कारनामे दाखवायचे का? आता मराठेही तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देतील,” असा इशारा जरांगेंनी दिला.

भर चौकात कान फोडले पाहिजेत’ – प्रवीण दरेकर

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही वाघमारेंवर कडक शब्दांत टीका केली. “कोणत्याही समाजाच्या महिलांबद्दल असे बेजबाबदार आणि घृणास्पद वक्तव्य करणे चुकीचे आहे. केवळ पब्लिसिटीसाठी हे विक्षिप्त विधान केले असून, अशा व्यक्तीची भर चौकात कानउघडणी करून कान फोडले पाहिजेत.”

तुमची राजकीय पातळी किती खालावली आहे हे दिसते – रेखा कोंडे

शिवसेना नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या, “हा फक्त मराठा नाही, तर सर्व महिलांच्या सन्मानाचा विषय आहे. जातीय राजकारणासाठी तुम्ही नेत्यांच्या घरातील महिलांपर्यंत पोहोचता, यावरून तुमची सामाजिक आणि राजकीय पातळी किती खालावली आहे हे दिसते.”

लक्ष्मण हाकेंची ‘सावध’ प्रतिक्रिया

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वाघमारेंच्या विधानाचे समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले, मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे जरांगेंवरच टीका केली. “नवनाथ आबांच्या विधानाचे मी समर्थन करत नाही, पण तुम्ही जरांगेंची भाषा सहन करता ना? ते लोकांच्या व्यंगावर, आई-बापावर आणि भुजबळांवर खालच्या भाषेत बोलतात, मग आता नवनाथ आबा बोलले की तुम्हाला का वाईट वाटते?” असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.

हेही वाचा…

OBC नेत्यांची गोंडस मुलं, पैसा पाहून मराठा मुली घरात घुसतात:नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी निषेध

ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या तरुणींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले आहे. “ओबीसी नेत्यांची सुंदर मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या तरुणी त्यांच्या घरात घुसतात,” असे संतापजनक वक्तव्य वाघमारे यांनी केले आहे. या विधानानंतर राज्यभरात मोठा वाद पेटला असून, मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी वाघमारे यांच्या विरोधात निदर्शने केली जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलाल, तर याद राखा!:मनोज जरांगेंचे वाघमारेंना प्रत्युत्तर; म्हणाले- सरकारला 58 लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे द्यावीच लागतील

“मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर वेळ आल्यास मराठे हे सरकार पाडतील. सरकारने मराठ्यांच्या 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी (जात पडताळणी) द्यायलाच हवी. जर यातील एकही नोंद सरकारने कमी केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा थेट आणि अत्यंत आक्रमक इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेत आपली पुढील रणनीती आणि सरकारवरील रोष व्यक्त केला. येथे वाचा संपूर्ण बातमी

उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचंय: तेच मनोज जरांगेंना शिंदेंविरुद्ध रसद पुरवत आहेत; नवनाथ वाघमारेंचा खळबळजनक आरोप

‘मराठा समाजाच्या मुली ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून त्यांच्या घरात घुसतात,’ असे संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करून राज्यभरात खळबळ उडवून देणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आता आणखी एक सनसनाटी आरोप केला आहे. “उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पडत असून, ते आणि आमदार प्रसाद लाड हेच मनोज जरांगे पाटील यांना आर्थिक रसद पुरवून एकनाथ शिंदे यांना टार्गेट करायला सांगत आहेत,” असा अत्यंत खळबळजनक दावा वाघमारे यांनी केला आहे. यामुळे राज्यात आधीच तापलेला मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत कुरघोड्यांच्या वळणावर पोहोचल्याचे दिसत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.