Headlines

बल्क युझर्सच्या पेट्रोल पंपावरील खरेदीवर 90 दिवसांची बंदी:आता केवळ घाऊक केंद्रांवर पेट्रोल – डिझेल मिळणार; रेटच्या फरकामुळे निर्णय

सरकारने औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक म्हणजेच सर्व मोठ्या वापरकर्त्यांना (बल्क युजर्सना) किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, आता या ग्राहकांना केवळ घाऊक विक्री केंद्रांमधून (बल्क सेल पॉइंट्स) इंधन खरेदी करावे लागेल. ही बंदी सुरुवातीला 90 दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर…

Read More

राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार:धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रामुख्याने नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे सर्व…

Read More

दर्जेदार शिक्षणाची संधी:केंद्रीय विद्यालयात 200 जागा; उद्यापासून ऑफलाइन प्रक्रिया

नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रीय विद्यालयात येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेश प्रक्रियेला १५ जुलै २०२६ पासून सुरुवात होत आहे. एकूण २०० जागा असून, विशेष म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. पालकांना अर्ज जुने शहरातील हरिहपेठमधील जि.प. टाऊन हायस्कूल कार्यालयातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाढती शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रीय स्तरावरील…

Read More

राज बब्बर@74; रेपचा सीन पाहून रडली होती आई:मुस्लिम पत्नीने धर्म बदलण्यास नकार दिला, शाहरुखने विचारले- खरंच चुंबन घेता का?

महाभारत बनवणारे बी.आर. चोप्रा या शोपूर्वी एक चित्रपट बनवत होते. नाव होतं ‘इंसाफ का तराजू’. चित्रपटात खलनायक रमेश गुप्ता बनण्यासाठी कोणताही मोठा अभिनेता तयार नव्हता, ज्याला झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या पात्रांवर बलात्कार करताना दाखवायचे होते. प्रत्येक अभिनेत्याला भीती होती की ही भूमिका त्याची प्रतिमा खराब करेल. तेव्हा एका नवोदित अभिनेत्याने या भूमिकेसाठी होकार…

Read More

पिकअपच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार:6 महिन्यात 525 अपघाती मृत्यू‎

भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ६५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी दीड ते तीन वाजेच्या सुमारास दौंड-नगर रोडवरील हिंदुस्थान कारखान्यासमोर घडली. मारुती गोविंद शिंदे (वय ६५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रभाकर गोविंद शिंदे (वय…

Read More

मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट 23-24 मे रोजी:पुण्यात पारंपरिक म्हणींवर आधारित सर्जनशील नृत्याविष्कार

मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट हा उपक्रम २३ आणि २४ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक म्हणी व वाक्प्रचारांच्या माध्यमातून समकालीन वास्तवावर आधारित सर्जनशील नृत्याविष्कार सादर करण्याची संधी या उपक्रमातून दिली जाईल. ज्येष्ठ कथक नृत्यांगना विदुषी शमा भाटे, नादरूप संस्था आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने सायंकाळी ५.३० वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक…

Read More

तरुणींमध्ये स्तनातील गाठींचे प्रमाण वाढले:दुर्लक्ष करू नये, वेळेत तपासणी करणे गरजेचे – डॉ. सुजाता राजपूत

अलीकडच्या काळात २० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये स्तनातील गाठी आढळण्याचे प्रमाण वाढले आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यातील बहुतांश गाठी कर्करोगाच्या नसतात, तरीही स्तनात जाणवणाऱ्या कोणत्याही नव्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता राजपूत यांनी केले आहे. डॉ. राजपूत यांच्या मते, पूर्वी स्तनातील गाठींची समस्या…

Read More

भाम धरण घाटमाथ्यावरील ‘सुनाकडा' धबधबा रौद्ररुपात

तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील प्रसिद्ध सुनाकडा धबधबा जोरदार प्रवाहित झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याने रौद्र रूप धारण केले असून, त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. रस्त्याच्या कडेला आणि सुनसान परिसरात असलेल्या या धबधब्याला स्थानिकांनी ‘सुनाकडा’ हे नाव दिले आहे. सध्या पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्याने धबधबा अधिकच आकर्षक दिसत…

Read More

मूव्ही रिव्ह्यू: राजा शिवाजी:स्वराज्याची भावना भव्यतेने मांडणारा सिनेमा; रितेश देशमुखचे प्रभावी दिग्दर्शन आणि स्टारकास्टचा दमदार अभिनय

महाराष्ट्र दिनानिमित्त प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नाही, तर स्वराज्य आणि मराठा अस्मिता अनुभवून देणारी कथा आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित हा चित्रपट नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक ठिकाणी त्यात प्रामाणिकपणा स्पष्ट दिसतो. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली केली आहे आणि…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार:सरकारने मराठा उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय, अंतरवालीत निर्णायक लढा; एकही मागणी मागे ठेवणार नाही

“या सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी लागते. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट असणे खूप महत्त्वाचे आहे,” असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More