Headlines

अचूक नोंदींसाठी बीएलओंना नागरिकांचे सहकार्य आवश्यक:इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांचे आवाहन‎

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद होणे आवश्यक असून, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांना नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले. तहसील कार्यालयात आयोजित बीएलओ व बीएलए यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस निवडणूक…

Read More

गंगापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश:आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष संजय जाधव यांनी घेतली होती भेट‎

गंगापूर शहरात मागील सात-आठ वर्षांपासून नगर पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची आठवण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना करून दिल्यावर त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भात दि. १३ रोजी आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष…

Read More

पुणे विधान परिषद निवडणूक:काँग्रेसमध्ये खदखद! अरविंद शिंदेंची थेट हायकमांडकडे धाव; प्रदेशाध्यक्ष सपकाळांविरोधात तक्रार

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे धाव घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे पुणे काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावरही…

Read More

विरारच्या अर्नाळा बीचवर मोठी दुर्घटना:समुद्रात गेलेली 4 मुले बुडाली; 2 बेपत्ता; प्रशासनाची समुद्रात जाण्यास होती बंदी

विरारमधील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचा स्पष्ट इशारा आणि बंदी आदेश धुडकावून समुद्रात पोहण्यासाठी गेलेली नालासोपारा येथील 4 अल्पवयीन मुले बुडाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. यापैकी 2 मुलांना वाचवण्यात पोलिसांना आणि होमगार्डना यश आले असून, बेपत्ता असलेल्या उर्वरित 2 मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत…

Read More

शिक्षणसेवेस हातभार:विद्यालयासाठी शेतकरी कुटुंबाकडून 50 हजार

येथील शेतकरी केशव रामनाथ सोनवणे व सुरेश रामनाथ सोनवणे यांनी आपल्या मातोश्री भागीरथीबाई रामनाथ सोनवणे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त मनेगाव नूतन जवाहर विद्यालयास २५,००० तसेच शितलताई रमण शिंदे यांनीही मातोश्री सोनवणे यांच्या स्मरणार्थ विद्यालयास २५,००० रुपयांची देणगी देऊन शिक्षणसेवेस हातभार लावला. अशा प्रकारे शेतकरी सोनवणे कुटुंबाकडून विद्यालयाच्या विकासासाठी एकूण ५०,००० रुपयांची देणगी देण्यात आली. शेतकरी हा…

Read More

पाचोडला बुद्ध जयंतीनिमित्त मिरवणूक:भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

प्रतिनिधी | पाचोड तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पैठण चौकात भगवान बुद्धांच्या मूर्तीला भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन केले. सभापती राजू नाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, मनोज नरवडे यांच्या हस्ते पूजन झाले. यानंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या…

Read More

कृउबास उपसभापतीपदी अर्चना कणसे बिनविरोध:नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत महिलेला प्रथमच बहुमान

नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अर्चना कणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिलेला हे प्रतिष्ठेचे पद भूषवण्याचा मान मिळाला आहे, ज्यामुळे सहकार क्षेत्रात महिलांच्या वाढत्या नेतृत्वाला बळकटी मिळाली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपसभापतीपदासाठी विहित मुदतीत अर्चना…

Read More

NEET UG 2026 Paper Leak NEW Update; NTA Refund Exam Fee

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक NEET मुद्द्यावरून गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, NTA चे DG अभिषेक सिंह आणि PMO चे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शुल्क परताव्यासाठी बँक खात्याची माहिती जमा…

Read More

भगवंत दिसत नसला तरी प्रत्येक कणात विराजमान- साक्षी महाराज:खंडाळ्यातील संत गोरोबाकाका मंदिरात कीर्तन‎

भगवंत डोळ्यांनी दिसत नसला तरी तो प्रत्येक कणात विराजमान आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य साक्षी दीपक महाराज ढोकळे यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील संत गोरोबाकाका मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी आयोजित कीर्तन सेवेप्रसंगी त्या बोलत होत्या. कीर्तनाची सुरुवात अभंग, भारूड आणि विविध दृष्टांतांनी झाली. भक्तीचा महिमा सांगताना साक्षी महाराज म्हणाल्या, वारा दिसत नाही पण…

Read More

जिममध्ये जास्त वजन उचलल्याने मेंदूची आर्टरी फाटली:नागपुरातील धक्कादायक घटना; डॉक्टरांनी 'गोल्डन अवर'मध्ये वाचवले तरुणाचे प्राण

पिळदार शरीरयष्टीसाठी व्यायामशाळेत क्षमतेहून जास्त वजन उचलणाऱ्या एका तरुणाची मेंदूची आर्टरी अर्थात रक्तवाहिनी फाटल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेत सदर तरुणाचे प्राण संकटात सापडले. पण त्याला गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. यासंबंधीच्या माहितीनुसार, ओम भोयर असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ओम हा गत 10 तारखेला नेहमीसारखा जिममध्ये गेला…

Read More