Headlines

ठाकरे गटाची मध्यरात्री मोठी खेळी:ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीसाठी वरुण सरदेसाई पुण्यात, गुपचूप भेटीवर शिंदे गटाची टीका

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला असतानाच, आता पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदारांपैकी ५ जण सध्या दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अज्ञातवासात असल्याची माहिती असताना, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा खटल्याचा काल न्यायालयात निकाल लागल्यानंतर ओमराजे पुण्यातील…

Read More

शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन:रायगडावरून संभाजीराजेंची भावनिक साद, 352 व्या सोहळ्यात मानाचा मुजरा

रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी याच रायगडावर पार पडला होता….

Read More

बिलासाठी ठेकेदाराला मागितली 15 लाखांची लाच:5 लाख स्वीकारताना PWD इंजिनिअरला कार्यालयातच अटक, जळगाव एसीबीची कारवाई

जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील थकीत बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे तब्बल १५ लाखांची मागणी करणाऱ्या योगेश अहिरे या ज्युनियर इंजिनिअरला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. शनिवारी भरदिवसा शासकीय कार्यालय परिसरात झालेल्या या धडक कारवाईमुळे बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत काही विकासकामे पूर्ण…

Read More

Rain in more than 25 states till August 5, signs of heavy rain for 2 days in Vidarbha, 68 dead in floods, 100 still missing

Marathi News National Rain In More Than 25 States Till August 5, Signs Of Heavy Rain For 2 Days In Vidarbha, 68 Dead In Floods, 100 Still Missing डी. कुमार शर्मा | शिवसागरहून2 तासांपूर्वी कॉपी लिंक तसे पाहिले तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा दरवर्षी महापूर आणि विध्वंस आणते, पण या वेळी परिस्थिती अधिक भयानक आहे. सर्वात वेदनादायक…

Read More

दूध भेसळ रॅकेट उघड, टोळीवर गंभीर गुन्हा दाखल:पुणे ग्रामीणमध्ये सखोल तपास सुरू, आरोग्याशी खेळ उघड

पुणे ग्रामीणमधील मंचर पोलिस ठाण्यात दूध भेसळीच्या एका संघटित रॅकेटवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत फसवणूक, बनावटपणा आणि कट रचण्यासह अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. तपास यंत्रणांनी हा प्रकार केवळ निकृष्ट दर्जाचे दूध विकण्यापुरता मर्यादित नसून ग्राहकांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक खेळ केल्याचा…

Read More

एफडीएचा बडगा:गुटखा तस्करांवर थेट मकोका, नेटवर्क नष्ट करणार; तुकाराम मुंढेंचा आदेश, किरकोळ विक्रेत्यांऐवजी मुख्य सूत्रधारांवर होणार कारवाई

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आता थेट मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना कडक आदेश . अनेक वर्षांपासून केवळ किरकोळ विक्रेते किंवा टपरीवाले सापडत असल्याने मुख्य सूत्रधार मोकाट राहत होते. आता मकोका अंतर्गत कारवाई होणार…

Read More

पाटण्यात खान सरच्या कोचिंगमध्ये घुसून मारामारी:गार्डचे डोके फोडले, पोस्टर फाडले; खान सर म्हणाले- कोचिंगवाल्यांनी उडवून देण्याची धमकी दिली होती

पाटण्यात मंगळवारी रात्री प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंगमध्ये घुसून मारहाण करण्यात आली आहे. आतमध्ये वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. मारहाणीत गार्डचे डोके फुटले आहे. गार्ड जखमी झाल्याची माहिती मिळाल्यावर खान सर कोचिंगमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, बिहार पोलिसांमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. आम्ही मुलांना सन्मानित करून खूप थकून गेलो होतो. काही समाजकंटक…

Read More

उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारलेही नाही:अजितदादांच्या अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याचे हे फळ, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी…

Read More

मृग नक्षत्र कोरडे:जून महिन्याचे 21 दिवस पावसाविना; खंडाळा परिसरात खरीप पेरण्या ठप्प, विहिरींच्या जलपातळीत मोठी घट‎

खंडाळा परिसरात मान्सूनच्या संथ गतीमुळे बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. चालू जून महिन्याचे पहिले वीस दिवस पूर्णपणे पावसाविना कोरडे गेले असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत शेतांमध्ये पेरणीची लगबग अंतिम टप्प्यात असायची, मात्र यंदा पावसाने दगा दिल्यामुळे हजारो हेक्टरवरील शेतजमीन अद्याप ओस पडली आहे. कडक ऊन आणि…

Read More

राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करताय:राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता, आंदोलनात तुमची कुवत शून्य- नवनाथ बन

महाराष्ट्राच्या आंदोलनात कुठेही नव्हतात. तुम्ही केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता या पलीकडे तुमची काहीही कुवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा की नारायण राणे, कंगना यांचे घरं कोणी तोडली होती? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. ऑपरेशन टायगर, लांडगा ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही, तुम्हाला ऑपरेशन गिधाडची…

Read More