Headlines

PSI with a salary of 90 thousand caught taking a bribe of 35 thousand, had demanded 65 thousand rupees to give a beer bar a break



पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी पकडले.

.

मिळालेल्या माहितीनुसार, मळसूर येथील बिअर शॉपीचे मालक शुभम थिटे यांच्या बिअर शॉपीला वाइन बारचा परवाना मिळवण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात देशमुख यांनी ६५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. लाच द्यायची नसल्याने शुभम थिटे यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मंगळवारी चान्नी पोलिस ठाण्यात ३५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने देशमुखला पकडले. चान्नी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीसाठी राज्यस्तरीय टोल फ्री क्रमांक १०६४ २४ तास उपलब्ध आहे. नागरिक acbmaharashtra.gov.i n या संकेतस्थळावर किंवा ‘एसीबी महाराष्ट्र’ या मोबाइल ॲपवर तक्रार नोंदवू शकतात. तक्रारदार थेट जिल्हास्तरावरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवू शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *