![]()
शहरात सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावरील दुभाजकांमध्ये झाडे लावून सौंदर्यीकरण करण्याऐवजी परिसरातील कचरा साठवला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनू चौक ते बीएसएनएल कार्यालय परिसरातील दुभाजक सध्या कचरा टाकण्याच
.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कचरा ओला होऊन परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डास, माशा व कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शहरातून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेस हा कचरा पडत असल्याने अकोट पालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. केवळ स्वच्छता मोहीम राबवून हा प्रश्न सुटणार नसून, दुभाजकात कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि नियमित स्वच्छता ठेवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दुभाजकाचा मूळ उद्देशच हरवला : रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, अपघात टळावेत आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी, या मूळ उद्देशाने लाखो रुपये खर्चून दुभाजक उभारण्यात आले. मात्र, देखभालीअभावी व पालिकेच्या दुर्लक्षामुळे या दुभाजकांचा वापर कचराकुंडीसारखा केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
आस्थापनांचा कचरा रस्त्यावर सोनू चौक ते बीएसएनएल कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने, व्यावसायिक आस्थापना व विविध लहान-मोठे व्यवसाय आहेत. या मार्गावर दिवसभर नागरिकांसह वाहनांची वर्दळ असते. मात्र, अनेक व्यापारी व दुकानदारांकडून दुकानातील कचरा नियमितपणे पालिकेच्या घंटागाडीत न टाकता थेट दुभाजकाच्या आतील भागात फेकला जात आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, कागद, पुठ्ठे व खाद्यपदार्थांच्या अवशेषांचा समावेश आहे. कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने चौकात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
दुभाजक हे शहर सौंदर्यात भर घालणारे असावे ^सोनू चौकातील रस्ते दुभाजक कचरा टाकण्याचे ठिकाण न राहता स्वच्छ, सुस्थितीत व शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असावे. यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावी. अन्यथा स्वच्छ शहराची संकल्पना ही केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे.- मनीष राऊत, रहिवासी