Headlines

कोलकातात हॉटेलला आग, 9 जण ठार, 6 जखमी:मृत्यू झालेल्यांत बांगलादेशींचाही समावेश, येथे उपचार घेण्यासाठी आले होते




कोलकातातील एका हॉटेलला मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका मुलाचाही समावेश आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. फ्री स्कूल स्ट्रीटवरील हॉटेल तैबामध्ये आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये बहुतेक लोक झोपले होते. यावेळी संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला. परिणामी, लोकांचा गुदमरून मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये काही बांगलादेशी नागरिकही आहेत. ते येथे उपचारासाठी आले होते. मृतांत मेघालय आणि पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथील रहिवाशांचाही समावेश आहे. आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमधून 28 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना कोलकाता येथील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग लागण्याचे कारण सध्या समोर आले नाही. पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. बातमी अपडेट केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *