Headlines

हॉलिडे होम आता फक्त छंद नाही, तर कमाईचे साधनही:2026 पर्यंत 37 हजार कोटींची बाजारपेठ; भाड्याने 12% पर्यंत परतावा

गोवा, अलिबाग, कसौली आणि कुमाऊंच्या टेकड्यांसारख्या पर्यटन स्थळांवर आता लोक फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी घरे खरेदी करत नाहीत. एक नवीन ट्रेंड उदयास आला आहे. हा आहे ‘भाड्याचे उत्पन्न’ (रेंटल इन्कम) मिळवण्याचा. म्हणजे, जो कधी जीवनशैलीसाठी घेतलेला निर्णय होता, तो आता एक गुंतवणूक धोरण बनला आहे. डोंगराळ प्रदेशातील आणि किनारी भागातील घरे भाड्याने देणे नवीन नाही, पण…

Read More

कपडे धुण्यास गेलेल्या महिलेसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू:नांदूरशिंगोटेतील दुर्घटना, ​डिग्रसच्या कुटुंबावर ओढवला बिकट प्रसंग

नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील नागरेवस्ती परिसरातील बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्यासोबत गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. ​मनीषा विजय रामजोशी (२८), मुलगा कार्तिक विजय रामजोशी (११), तसेच तिचे भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत….

Read More

धीरेंद्र शास्त्रींचा दावा- ऑक्सिजन बंद होऊनही मुलगा वाचला:नागपुरात ‘चमत्कारा’च्या दाव्यावरून नवा वाद

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या रामकथा कार्यक्रमादरम्यान ‘दिव्य दरबार’मध्ये त्यांनी एका गंभीर आजाराने ग्रस्त बालकाचा जीव “चमत्काराने” वाचल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANIS) आक्रमक झाली असून, त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी…

Read More

नाशिक विधान परिषदेत महायुतीतील बंड शमले:अखेर गोकुळ गीते यांची माघार; कुणाल दरडेंचा मार्ग सुकर; महायुतीच्या नेत्यांची शिष्टाई फळाला

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात नेत्यांना मोठे यश आले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू असलेले मनधरणीचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. गोकुळ गीते यांनी केवळ माघारच घेतली नाही, तर…

Read More

दाभा येथे बौद्धाचार्य श्रामणेरांचे स्वागत; ग्रामस्थांकडून 2 कि.मी. पर्यंत पुष्पवृष्टी:बुद्ध धम्म मानवतेचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्गाचा कानमंत्र‎

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने बडनेरा येथे सुरू असलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरातील श्रामणेरांचे दाभा येथे उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. बौद्धाचार्य श्रामणेर संघाला भोजनदान देण्यात आले. गावातील बोद्ध उपासक, उपासिका, नागरिकांनी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत श्रामणेरांचे स्वागत केले. संपूर्ण गाव बुद्धमय वातावरणाने भारावून गेले होते. श्रामणेरांच्या स्वागतासाठी गावात विविध ठिकाणी…

Read More

वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ:मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' उपक्रम; नेमका उपक्रम काय?

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरण सेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी…

Read More

शक्ती कायद्यात गुन्हेगाराला 21 दिवसांत फाशीची तरतूद:कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांप्रकरणी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून राज्यात शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राची ओळख प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, पण आज परिस्थिती भीषण आहे. राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार पाहून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे, असा संताप…

Read More

BHMS डॉक्टरांना एमएमसी नोंदणीला मार्डचा तीव्र विरोध:राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा

सेंट्रल मार्डने (महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) बीएचएमएस (होमियोपॅथी) डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची (एमएमसी) नोंदणी देण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. असा निर्णय घेतल्यास आधुनिक वैद्यकीय क्षेत्राची नियमावली मोडीत निघेल, रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड होईल आणि पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवेचा दर्जा घसरेल, अशी चिंता मार्डने व्यक्त केली आहे. मार्डने ठाम भूमिका घेतली आहे की,…

Read More

राम चरण म्हणाले- कधीही राजकारणात येणार नाही:दोन नौकांवर स्वार होणे कठीण, सर्वात मोठा एंटरटेनर बनायचे; हनुमानाचे भक्त, म्हटले- माझे नावच हनुमान, पार्ट-2

ग्लोबल स्टार राम चरण 4 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पेद्दी’ चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी राम चरण यांनी दैनिक भास्करशी बोलताना अध्यात्म, शिस्त आणि राजकारण यावर चर्चा केली. राम चरण यांना विचारण्यात आले की त्यांना कधी वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा दबाव जाणवतो का, तेव्हा ते म्हणाले की ते एका चित्रपट कुटुंबातून येतात आणि त्यांच्यासाठी ही…

Read More

मिथॉस AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका:अर्थमंत्री सीतारामन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली; मिथॉस काय आणि ते धोकादायक का

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ एआय मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा करण्यात आली. हे एआय मॉडेल इतके प्रगत आहे की हॅकर्स त्याचा वापर दशकांपासूनच्या अज्ञात त्रुटी शोधून आर्थिक क्षेत्रावर सायबर हल्ले करण्यासाठी करू शकतात. बँकांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी बँकांना…

Read More