Headlines

Shefali Bagga Denies Yuzvendra Chahal Dating Rumors

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर आता स्पोर्ट्स अँकर शेफाली बग्गाने मौन सोडले आहे. खरं तर, धनश्री वर्मापासून वेगळे झाल्यानंतर चहलचे नाव सातत्याने शेफालीसोबत जोडले जात आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये शेफालीने या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या. ती म्हणाली की, लोक खूप लवकर कोणत्याही भेटीला चुकीचे नाव देतात. डिनर करणे म्हणजे डेटिंग…

Read More

मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई:परिवहन मंत्री म्हणाले- आधी नोटीस देणार, 3 महिन्यांत शिकले नाहीत तर परवाना निलंबित

मराठी भाषा न जाणणारे चालक आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालवू शकणार नाहीत. ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते म्हणाले – 20 ऑगस्टपासून मोहीम सुरू होईल. मंत्री सरनाईक म्हणाले – आधी नोटीस देऊन चालकांना 3 महिन्यांत मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठी न शिकल्यास त्यांचा परवाना निलंबित केला जाईल. ही मोहीम संपूर्ण राज्यात…

Read More

आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले:वैधताप्रमाणपत्र सहज मिळावे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माेर्चा; जोरदार घोषणा

कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कोळी महासंघातर्फे आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर…

Read More

वैरागच्या व्हाय नॉट एकांकिकेचा विशेष गौरव:आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनात वैरागच्या ”साई आयुर्वेद”चा डंका‎

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात वैऱागच्या साई आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “व्हाय नॉट” या एकांकिकेचा विशेष गौरव करण्यात आला. स्पंदन २०२६ या विद्यापीठस्तरीय सांस . नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे पद्मश्री चैत्राम देवचंद पवार, सन्माननीय अतिथी पद्मश्री पोपटराव बागुजी पवार, विभागीय आयुक्त डॉ….

Read More

राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय, महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी निशुल्क जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आज घेतला. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालयासाठी याच निर्णयाने जागा देण्यात आली. आता राज्यात केंद्रीय विद्यालये उभारण्यासाठी गती येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज…

Read More

553 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर:लवकरच मतदार यादी, निम्म्या जिल्ह्यात आचारसंहिता

अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होईल, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली जाईल. या ग्रामपंचायती जिल्ह्याच्या निम्म्या भौगोलिक क्षेत्रावर पसरलेल्या असल्याने निवडणुकीच्या काळात तेथे आचारसंहिता लागू होईल. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी…

Read More

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी रुजू:जनहितार्थ प्रकल्पांना गती देण्यावर भर देणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी (१० मे) पदभार स्वीकारला. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर के. मंजुलक्ष्मी यांनी ‘पीएमआरडीए’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार लक्षात घेता,…

Read More

अमरावतीच्या ‘फिशरीज हब' प्रकल्पाला गती:विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मनपात पोहोचून घेतला आढावा‎

अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात आज, मंगळवारी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत आयोजित या बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मत्स्य विभाग व महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील…

Read More

आषाढी वारीत डायल 108 अंतर्गत विशेष सेवा:2,445 वारकऱ्यांना फायदा, 27 रुग्णवाहिका 24 तास सेवेत; पंढरपूरमध्ये नियंत्रण कक्ष

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल १०८) अंतर्गत विशेष आरोग्यसेवा पुरवण्यात आली. या सेवेमार्फत २७ रुग्णवाहिका २४ तास तैनात होत्या, ज्यांनी एकूण २,४४५ वारकऱ्यांना वेळेत वैद्यकीय मदत दिली. ही सेवा बीव्हीजीद्वारे संचालित केली जाते. वारकऱ्यांना तात्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी पंढरपूर येथे एक विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून पालखी…

Read More

पती-मुलीला मारण्यासाठी अघोरी विद्येचा वापर:महिलेवर अमानुष प्रथेप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यात पती आणि मुलीला वश करण्यासाठी तसेच त्यांना त्रास देण्यासाठी अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचा वापर केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड, मुंबई येथील रहिवासी असलेल्या तुलिका योगेश धुत (वय ४४) हिच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे. याप्रकरणी खराडी येथील योगेश…

Read More