पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई: 104 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू:1.73 लाख नागरिकांना दिलासा; 5.5 कोटींहून अधिक निधी मंजूर
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १११ गावे आणि ४२६ वाड्यांना एकूण १०४ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला…