सायबर पोलिसांची मोठी कारवाई:बाल लैंगिक शोषणाच्या 490 क्लिप्स बाळगणारा फार्मसीचा विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये जेरबंद; तरुण उच्चशिक्षित कुटुंबातला
बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित डिजिटल सामग्री (चाइल्ड पॉर्नोग्राफी) बाळगणे आणि तिची विक्री/देवाणघेवाण करणाऱ्या विकृत साखळीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका खासगी मेडिकल दुकानात काम करणाऱ्या 28 वर्षीय बी. फार्मसी सुशिक्षित तरुणाला अटक करण्यात आली आहे. अक्षय प्रकाश गायकवाड (रा. साईनगर, भावसिंगपुरा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नेमकी घटना काय? गोपनीय बातमीवरून…