Headlines

अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची धरपकड:काँग्रेसचा दडपशाहीचा आरोप; शहरात कडेकोट बंदोबस्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शनिवारी होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपासून प्रमुख आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काही कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसाही बजावण्यात आल्या असून, दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे-सातारा…

Read More

पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?:संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी…

Read More

अभिजीत दीपकेंचा थेट सवाल:शिवीगाळ करणे हा गुन्हा असेल, तर भाजपच्या आयटी सेल आणि नेत्यांवर कधी कारवाई होणार? तरुणीवरील FIRला विरोध

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या रुचिका सिंग या तरुणीवर नोएडा पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या कारवाईला ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शिवीगाळ करणे हा काही गुन्हा नाही; जर तसे…

Read More

सणांपूर्वी टूथपेस्टपासून ते पेंटपर्यंत वस्तू महाग होणार:HUL आणि एशियन पेंट्ससह 8 कंपन्या गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढवणार

देशातील सर्वात मोठ्या FMCG आणि ग्राहक कंपन्या उत्सव हंगामाच्या अगदी आधी आणि सलग दुसऱ्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. टूथपेस्टपासून ते टायर आणि पेंटसारख्या वस्तू महाग होणार आहेत. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे कमोडिटीची किंमत वाढत आहे, त्यामुळे देशात महागाई दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आगामी तिमाहीत डिटर्जंट…

Read More

PM Modi LIVE | Narendra Modi Andhra Pradesh Karnataka Speech LIVE Update; Alluri Airport Mysuru Viveka Smaraka

Marathi News National PM Modi LIVE | Narendra Modi Andhra Pradesh Karnataka Speech LIVE Update; Alluri Airport Mysuru Viveka Smaraka BJP 3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी ते पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा आणि रस्ते जोडणीशी संबंधित सुमारे 18000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी…

Read More

'मला तुझी गरज नाही' या टोमण्यांमुळे मुलाची हत्या:आईने हौदात बुडवून मारले, अपघात दाखवण्यासाठी खुर्ची ठेवली, माहेरी पळून गेली

मला आता तुझी गरज नाही, माझा वंश पुढे नेण्यासाठी मुलगा आणि मुलगी आहेत. हरियाणातील सोनीपतच्या मुंडलाना गावात हेच दोन वर्षांच्या चिमुकल्या चिरांशच्या हत्येचे कारण बनले. पत्नीने पतीशी सूड घेण्यासाठी स्वतःच्या मुलाला पाण्याच्या हौदात बुडवून मारले. 29 जुलै रोजी घडलेली ही घटना सुरुवातीला अपघात मानली गेली. आरोपी प्रियानेही हा अपघात असल्याचे सिद्ध करण्यासाठी पूर्ण कहाणी रचली,…

Read More

तिसरे अपत्य अन् अतिक्रमण भोवणार!:छत्रपती संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस; भाजपसह एमआयएमला मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात एक अतिशय मोठी आणि खळबळजनक घडामोड घडली आहे. महापालिका प्रशासनाने तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या असून, त्यांच्या नगरसेवकपदावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. या कारवाईमुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमला (MIM) मोठा धक्का बसला असून, शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपात्रतेच्या नोटिसांमागील प्रमुख कारणे…

Read More

बिबट्यांचा वावर वाढल्याने वनविभाग सतर्क‎:देवठाणमध्ये नागरिक अन् विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे!

परिसरात ऊस, गिन्नी गवत, फळझाडे आणि डोंगराळ भागामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्री लहान मुलांना एकटे अंगणात खेळू देऊ नये, जनावरांचे गोठे मजबूत व बंदिस्त ठेवावेत. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना-जाताना समूहाने यावे. कुठेही बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांनी केले. वनविभाग, ग्रामपंचायत देवठाण आणि देवठाण येथील…

Read More

नेवासेत कामिका एकादशी यात्रेची तयारी:दिंड्यांची नोंदणी

कामिका एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कामिका एकादशी यात्रेच्या नियोजनासाठी संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात मंदिर विश्वस्त मंडळ, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पत्रकार, सेवेकरी व दिंडी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली.या यात्रेसाठी परिसरातून सुमारे अडीचशे दिंड्या सहभागी…

Read More

शिर्डीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड:मुद्देमाल केला जप्त

शिर्डी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रेल्वे ट्रॅकजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तलवार, दोन चाकू, मिरचीपूड, कटावणी, नायलॉन दोरी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे १७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस…

Read More