Headlines

अभिजीत दीपकेंचा थेट सवाल:शिवीगाळ करणे हा गुन्हा असेल, तर भाजपच्या आयटी सेल आणि नेत्यांवर कधी कारवाई होणार? तरुणीवरील FIRला विरोध




दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या रुचिका सिंग या तरुणीवर नोएडा पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या कारवाईला ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शिवीगाळ करणे हा काही गुन्हा नाही; जर तसे असेल तर महिलांना ऑनलाइन घाणेरड्या शिव्या देणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर आणि नेत्यांवर गुन्हे कधी दाखल होणार?” असा थेट सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी स्वतः एक व्हिडिओ जारी करत या तरुणीला माफ करण्याची आणि दिशाभूल झालेल्या मुलांना योग्य मार्ग दाखवण्याची सामंजस्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रुचिका सिंग हिनेही एका व्हिडिओद्वारे हात जोडून देशवासीयांची माफी मागितली आहे. ‘शिवी देणे वाईट असू शकते, पण तो गुन्हा नाही’; अभिजीत दीपकेंचा भाजपवर हल्लाबोल नोएडामध्ये रुचिका सिंग हिच्यावर FIR दाखल झाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’ (X) वर व्हिडिओ पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केली. “जर शिवीगाळ केल्याबद्दल तुम्ही गुन्हे दाखल करत असाल, तर भाजपच्या आयटी सेलवर गुन्हे कधी दाखल होणार? ते वर्षानुवर्षे महिलांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देत आहेत आणि अभिमानाने ‘Followed by PM Modi’ असे बायोमध्ये लिहितात. या देशात तरुणांसाठी वेगळा कायदा आणि भाजप नेत्यांसाठी वेगळा कायदा आहे का?” नेत्यांची उदाहरणे दीपकेंनी भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी संसदेत एका सहखासदारासाठी वापरलेले अपशब्द आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘ANI’च्या कॅमेरामनला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ याचे दाखले देत भाजपला कोंडीत पकडले. समज द्या, गुन्हा नको “शिवी देणे हे वाईट असू शकते, पण तो गुन्हा नाही. कोणी शिवी देत असेल तर त्याला समज द्या; पण थेट गुन्हा कोणत्या आधारावर दाखल केला जात आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फौजदारी गुन्हा दाखल करणे हा यंत्रणेचा गैरवापर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रवक्ते सौरभ दास यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. “अपमानास्पद भाषेचा वापर निंदनीय आहे, पण त्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करणे हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर आहे. या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करायला हवा होता.” “लोकसभेतील 50 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे आहेत, ज्यात भाजपचे 100 खासदार आहेत. पोलिसांनी आपली ऊर्जा त्यांच्यावर खर्च करावी, एका 25 वर्षांच्या तरुणीला त्रास देणे थांबवावे,” अशी मागणी दास यांनी केली. दात आणि जीभ आपलीच असते, मी तिला माफ करू इच्छितो’: पंतप्रधान मोदी या वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी करून देशातील जनतेशी आणि तरुणांशी संवाद साधला. “काही खोडकर मुलांनी मला आणि माझ्या दिवंगत आईबद्दल अत्यंत अश्लाघ्य शब्दांत शिवीगाळ केली. हा प्रकार दुर्दैवी आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजाला न शोभणारा आहे. पण बालपणी चुका होतात, आणि त्या सुधारण्याची संधीही मिळायला हवी. ही दिशाभूल झालेली मुले आहेत.” पंतप्रधानांनी माफ केले “त्यांना शिक्षा देणे, न्यायालयांच्या फेऱ्या मारायला लावणे किंवा त्यांचा छळ करणे, यामुळे परिस्थिती बदलणार नाही. मी त्यांना माफ करू इच्छितो आणि समाजानेही ही भूमिका स्वीकारावी. कधी कधी दातांखाली जीभ येऊन रक्त निघते, म्हणून आपण दात तोडत नाही, कारण दात आणि जीभ दोन्ही आपलीच असतात,” असे सामंजस्याचे विचार मोदींनी मांडले. ती माझी शेवटची चूक, मला लाज वाटतेय; तरुणीचा माफीनामा पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर काही तासांतच रुचिका सिंग हिने एक व्हिडिओ जारी करत जाहीर माफी मागितली. “जंतरमंतरवर काही लोक पंतप्रधानांना शिव्या देत होते. त्यांच्या चिथावणीला बळी पडून मी अपशब्द वापरले. माझे कृत्य क्षम्य नाही, पण मी देशवासीयांची माफी मागते. मला माझ्या कृत्याची एवढी लाज वाटतेय की मी कोणाशी नजर मिळवू शकत नाही. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे, कृपया मला माफ करा,” असे ती हात जोडून म्हणाली. पोलिसांची कारवाई सुरूच; ‘झीरो FIR’ दाखल सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकील स्मृती सिंग यांच्या तक्रारीवरून नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात रुचिका सिंगविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 352, 353(1) आणि 356(1) अंतर्गत जाणीवपूर्वक अपमान करणे, सार्वजनिक उपद्रव आणि मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा झीरो FIR असून पुढील तपासासाठी तो नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. रुचिका सध्या कुटुंबासह फरार असल्याचे समजते आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. संविधानिक पदाचा अपमान करून द्वेष पसरवल्याबद्दल कठोर कारवाईची मागणी तक्रारदार वकिलांनी केली आहे. हेही वाचा… अमेरिका से आया चुपके-चुपके, नाम है अभिजीत दिपके: रामदास आठवलेंची संसदेत फटकेबाजी, लाठीचार्जच्या चौकशीची मागणी
‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर उभारण्यात आलेले यशस्वी आंदोलन आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. या आंदोलनाची दखल आता थेट संसदेतही घेण्यात आली आहे. संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास आणि मिश्किल शैलीत अभिजीत दिपके यांचा उल्लेख करत सभागृहात एकच हशा पिकवला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *