Headlines

पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?:संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा




केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘जंतरमंतर कांड हे जालियनवाला बागसारखेच’ पेपरफुटीविरोधात न्याय मागण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर जंतरमंतरवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेची तुलना राऊत यांनी थेट ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडाशी केली. ते म्हणाले, “जालियनवाला बागेनंतर जर कोणते मोठे कांड झाले असेल तर ते जंतरमंतर कांड आहे. हे करणारे अमित शहा म्हणजे कायर आहेत. देशातील मुलांच्या भविष्याचे रक्षण गृहमंत्री करू शकले नाहीत आणि जेव्हा संसदेत या विषयावर चर्चेची वेळ आली, तेव्हा त्यांनी तेथून पळ काढला. ‘भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत आहे का?’ पुण्यात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अमित शहांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत आंदोलनाची हाक दिली आहे. यावर भाजपने ‘हिंसेला हिंसेने उत्तर देऊ’ अशी भूमिका घेतली. याचा समाचार घेताना राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिले. आंदोलन करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. तुम्ही हिंसेच्या गप्पा मारताय, पण तुमच्यात तशी हिंमत आहे का? पंतप्रधान मोदी रात्री १२ वाजता व्हिडिओ टाकतात, दिवसा व्हिडिओ टाकायला ते घाबरतात, आणि तुम्ही हिंसेची भाषा करता,” असा टोला त्यांनी लगावला. ‘शहा, तुम्ही एवढे का घाबरताय?’ अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर टीका करताना राऊत म्हणाले, “अमित शहा पुण्यात आले म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील फोर्स आणि आर्मी पुण्यात आणल्याचे कळतेय. शहा, तुम्ही एवढे का घाबरताय? दिल्लीत याच विद्यार्थ्यांनी तुम्हाला जंतरमंतरवर गुडघ्यावर आणले आणि नमवले आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सध्या मनाने भरकटले असून २०२९ च्या आधीच मोदी आणि शहा या पदावर नसतील,” असा दावाही राऊत यांनी केला. टिळक कुटुंबावरही साधला निशाणा अमित शहांच्या हस्ते आज पुण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राऊत यांनी टिळक कुटुंबावरही सडकून टीका केली. “लोकमान्य टिळकांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. पण टिळक कुटुंबाला नेमके झाले तरी काय? टिळकांचे वंशज आज शिंदे गटात गेले आहेत, याची त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांचे पूर्वज स्वाभिमानासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढले, तुरुंगात गेले आणि आज हे लोक काय करत आहेत?” असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. हेही वाचा.. अभिजीत दीपकेंचा थेट सवाल:शिवीगाळ करणे हा गुन्हा असेल, तर भाजपच्या आयटी सेल आणि नेत्यांवर कधी कारवाई होणार? तरुणीवरील FIRला विरोध दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या रुचिका सिंग या तरुणीवर नोएडा पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या कारवाईला ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शिवीगाळ करणे हा काही गुन्हा नाही; जर तसे असेल तर महिलांना ऑनलाइन घाणेरड्या शिव्या देणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर आणि नेत्यांवर गुन्हे कधी दाखल होणार?” असा थेट सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *