उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे
आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही….