Headlines

"माझ्याकडून असा अन्याय कधीच होणार नाही":मनोज जरांगे पाटील ठाम, 'राज्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणार'

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला आणि समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “राज्यातील एका भागाला आरक्षण आणि दुसऱ्या भागाला नाही, असे माझ्याकडून कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत मी…

Read More

सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर बदललं समीकरण?:पुण्यातील बिनविरोध निवडणुकीमागील मोठं राजकारण उघड; बिनविरोध कशी?

पुणे विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर बिनविरोध निकाल लागल्यानंतर पडद्यामागील राजकीय घडामोडींवर चर्चा रंगली आहे. राज्यातील 17 रिक्त जागांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असून 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक मतदारसंघांत नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यात पुण्यातील लढतीने विशेष लक्ष वेधले….

Read More

रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय:मंत्र्यांच्या हॉटेलात मटण विकतात, मग बंदी कशाला?,महाराष्ट्र क्षत्रिय धर्म पाळतो, मांसाहार करणारच- संजय राऊत

महाराष्ट्राचे सरकार बळी देऊन आलेले सरकार आहे. देवळात बळी देऊन आलेले हे सरकार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापण्यात आले ती सुद्धा कुर्बाणीच आहे ना? तिच्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेत आले ते दुसऱ्याच्या कुर्बाणीला विरोध करत आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात…

Read More

घरगुती LPG सिलेंडर ₹29 ने महागला:3 महिन्यांत दुसऱ्यांदा किमतीत वाढ, ₹89ने दर वाढले; दिल्लीत 14.2 किलोचा सिलेंडर ₹942 मध्ये मिळेल

घरगुती एलपीजी सिलेंडर 29 रुपयांनी महागला आहे. नवीन दर आज रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. दिल्लीत आता 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत ₹913 वरून ₹942 होईल. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी 7 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे दर ₹60 ने वाढवण्यात आले होते. अशा प्रकारे 3 महिन्यांच्या आत घरगुती सिलेंडर…

Read More

'प्रॉप कनेक्ट 2026' राष्ट्रीय परिषद पुण्यात:देशभरातील रियल्टर्स, विकसक सहभागी होणार; 'प्रॉप'चे आयोजन

पुण्यात ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ या राष्ट्रीय रियल इस्टेट सल्लागार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दी प्रोफेशनल रियल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स-इंडिया (नार-इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद रविवार, ६ जुलै २०२६ रोजी हॉटेल जेडब्ल्यू. मॅरिएट येथे होणार आहे. या एकदिवसीय परिषदेत देशभरातील ३८ शहरांमधील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स आणि ३०० हून…

Read More

कर्जमाफीसाठी आज संभाजीनगरातील केंब्रिज चौकात रोहित पवारांचे आंदोलन:सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ असणार उपस्थिती

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने सोमवारी (२९ जून) सकाळी ११ वाजता केंब्रिज चौकात भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या महाआंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, तब्बल एक हजारांहून अधिक बैलगाड्या रस्त्यावर उतरण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित…

Read More

भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट

पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे….

Read More

पल्स पोलिओ मोहीम:फुलंब्री तालुक्यामध्ये 98% बालकांना पोलिओचा डोस, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण‎

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत फुलंब्री तालुक्यात रविवारी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली. तालुक्यात एकूण १४ हजार १९० बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी पहिल्याच दिवशी १३ हजार ८९३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली. यामुळे पहिल्याच दिवशी तालुक्यात ९८% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले असून उर्वरित बालकांना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत…

Read More

वर्ल्ड बँकेत भारताचे कार्यकारी संचालक बनले अर्थशास्त्रज्ञ नीलकंठ मिश्रा:3 वर्षांचा असेल कार्यकाळ, परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि मार्केट स्ट्रॅटेजिस्ट नीलकंठ मिश्रा यांची वर्ल्ड बँकेत भारताचे नवे कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते वॉशिंग्टन येथील वर्ल्ड बँकेच्या मुख्यालयात 3 वर्षांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करतील. मिश्रा सध्याचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील. जोपर्यंत नीलकंठ मिश्रा आपला पदभार स्वीकारत…

Read More

आषाढी वारी:मुर्डेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे खामगावात उत्साहात स्वागत

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुर्डेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे खामगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. कन्हैया ड्रेसेसचे कृष्णा सोनवणे यांच्या निवासस्थानी दिंडी प्रमुख बालयोगी विद्यानंद महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुर्डेश्वर येथून निघणाऱ्या या मानाच्या पायी दिंडीचे हे चौदावे वर्ष आहे. या दिंडीबाबत माहिती देताना मुर्डेश्वर संस्थानाचे पीठाधीश बालयोगी…

Read More