शेवगावात बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात:सागवानाच्या लाकडाचीही होतेय वाहतूक, वनविभागाचे मात्र दुर्लक्ष
एकीकडे शासन स्तरावर मोठ्या थाटामाटात वृक्षारोपणाची उद्दिष्टे निश्चित करून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे प्रत्यक्ष शेवगाव परिसरात मात्र मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. वनविभागाचे दुर्लक्ष, गस्तीचा अभाव आणि सागवान लाकडाची दिवसाढवळ्या होणारी वाहतूक यामुळे वनविभागाच्या एकूणच कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळा हा झाडे, वेली आणि…