Headlines

हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल:भूसंपादन आदेशांवर सह्या; तत्कालीन‎ जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना जामीन नाही‎

बीड भूसंपादन लवाद प्रकरणातील ३१० कोटींच्या बनावट ‎‎आणि मागील तारखेच्या (बॅकडेटेड) आदेशांवर स्वतः ‎‎‎अविनाश पाठक यांच्याच स्वाक्षऱ्या ‎‎‎असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या ‎‎‎अहवालातून स्पष्ट झाले आहे. या‎‎गुन्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा‎‎थेट आणि सक्रिय सहभाग सिद्ध‎‎झाल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च ‎‎‎न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ‎‎‎न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी‎जामीन देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पाठक‎यांच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला असून, ७‎मेपासून न्यायालयीन…

Read More

जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावसाठी पाणी सोडणार‎:धरणाच्या डाव्या कालव्यातून जालना, परभणीसाठी पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग‎

जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने‎वाढ होत आहे. मात्र, माजलगाव धरणात केवळ‎१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे‎जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी‎पाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणात‎२५ टक्क्यांपर्यंत साठा होईपर्यंत पाणी सोडण्यात‎येणार आहे. जालना, परभणी जिल्ह्यात पाऊस‎कमी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून पाणी‎सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे‎येत्या २ ते ३ दिवसांत डाव्या कालव्यातून पाणी‎सोडण्यात येणार आहे.‎ मराठवाड्यात या वर्षी पाऊस…

Read More

शिरसाटांविरुद्ध पुराव्यांच्या आधारे आरोप : इम्तियाज जलील:कोर्टात भावनिक भाषण बालिशपणाचे : ॲड. काळे

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात बुधवारी कमालीचा ड्रामा आणि खडाजंगी पाहायला मिळाली. या सुनावणीत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्याही वकिलाशिवाय स्वत: न्यायालयात उभे राहून आपली बाजू मांडली, तर दुसऱ्या बाजूने पालकमंत्री शिरसाट यांच्यातर्फे ॲड. राजेश काळे यांनी जोरदार युक्तिवाद केला….

Read More

विनापरवाना टॅक्सीसेवा देणाऱ्या ‘रॅपिडो’च्या संस्थापकांवर गुन्हा:आरटीओने डमी राइडद्वारे केले स्टिंग ऑपरेशन

शहरात बेकायदा धावणाऱ्या ‘रॅपिडो’ बाइक टॅक्सी कंपनीविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा दणका दिला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही विनापरवाना ॲपद्वारे प्रवासी वाहतूक सुरू ठेवून शासनाची व प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी रॅपिडोचे संस्थापक, संचालकांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक अभिजित अण्णासाहेब जगनाडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

राजा मर्डर केस- सोनमचे शिलॉंग न्यायालयात आत्मसमर्पण:कारागृहात पाठवले; SC ने म्हटले होते- तांत्रिक त्रुटीच्या आधारावर जामीन देणे योग्य नाही

इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सोनम रघुवंशीने बुधवारी मेघालयच्या शिलाँग न्यायालयात आत्मसमर्पण केले. तिला तुरुंगात पाठवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने 23 जुलै रोजी सोनमचा जामीन रद्द करत तिला तीन आठवड्यांच्या आत संबंधित न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच सोनमने आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयात हजेरी लावली. सोनमच्या आत्मसमर्पणानंतर राजाचा भाऊ…

Read More

कार-दुचाकीची समोरासमोर धडक:2 तरुणांचा मृत्यू, पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घटना‎

पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रमानगरजवळ परिंदा हॉटेलसमोर कार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. प्रतीक संजय कांबळे (२०), सौरभ म्हात्रे (२३, दोघेही रा. बिडकीन, ता. पैठण) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जगद्गुरू रामानंदाचार्य संस्थानच्या रुग्णवाहिका चालकाला अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी…

Read More

दमदार पावसाची प्रतिक्षा:6 तालुक्यांत एकूण सरासरीच्या 40 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस

जिल्ह्यात जुलैचा महिना संपत आला तरी पावसाची विषमता दिसून येते. २९ जुलैपर्यंतच्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील १४ पैकी तब्बल ६ तालुक्यांमध्ये मान्सूनच्या एकूण सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. राहुरी, शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा आणि राहाता या ६ तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस आहे. जिल्ह्याची एकूण पावसाची टक्केवारी ४७.३ टक्के दिसत असली, तरी ती…

Read More

आज शेअर बाजारात फ्लॅट व्यवहार:सेन्सेक्स 77,650 आणि निफ्टी 24,200 वर, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 30 जुलै रोजी शेअर बाजारात फ्लॅट व्यवहार दिसून येत आहे. सेन्सेक्स 77,650 आणि निफ्टी 24,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये अधिक खरेदी आहे. तर बँकिंग आणि रिअल्टी शेअर्समध्ये विक्री आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 29 जुलै रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹9,400 कोटींचे शेअर्स विकले…

Read More

पिकअपच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार:6 महिन्यात 525 अपघाती मृत्यू‎

भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ६५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी दीड ते तीन वाजेच्या सुमारास दौंड-नगर रोडवरील हिंदुस्थान कारखान्यासमोर घडली. मारुती गोविंद शिंदे (वय ६५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रभाकर गोविंद शिंदे (वय…

Read More

पंजाब आज बंद, जाणून घ्या कुठे काय परिणाम:लुधियाना-बठिंडासह 9 जिल्ह्यांमध्ये बाजार, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन

बरनाला येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वाल्मीकी समाजाने गुरुवार (30 जुलै) रोजी पुन्हा पंजाब बंदची हाक दिली आहे. समाजाने बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, मॉल्स आणि इतर संस्था बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. बंदचा परिणाम सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर परिस्थिती सामान्य होईल. लुधियाना, बठिंडा, होशियारपूर, फाजिल्का, कपूरथळा,…

Read More