Headlines

7 सप्टेंबरला ठाकरे गटातील 15 आमदार जाणार:हिंदुस्थानी भाऊचा दावा, संजय राऊतांना 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत टोला

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ पुकारले आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्ध रीलस्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ याने एक दावा केला आहे. येत्या ७ सप्टेंबरला ठाकरे गटाचे तब्बल १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचा मोठा दावा त्याने इन्स्टाग्रामवर…

Read More

आशियाई खेळांसाठी पैलवान विनेश फोगाट चाचणी देऊ शकेल:सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली, म्हटले- तुम्ही उत्कृष्ट कुस्तीपटू आहात, पण देश सर्वात आधी

सर्वोच्च न्यायालयाने हरियाणाच्या ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाटला आशियाई खेळांच्या चाचणीची परवानगी दिली आहे. 28 मे रोजी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) ने फोगाटची चाचणी थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. या चाचण्या 30 आणि 31 मे रोजी दिल्लीत होणार आहेत. या चाचण्यांमधील…

Read More

जिल्ह्याला 2राज्यस्तरीय कृषी पुरस्कार; वंदना धोत्रे, राजेंद्र तालेंच्या कामाची दखल:मुंबईत 1 जुलै रोजी मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाकडून २०२४ वर्षासाठीचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात जिल्ह्याने दुहेरी बहुमान पटकावला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतकरी वंदना देविदास धोत्रे यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ तर दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांना सेंद्रिय शेतीसाठीचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार विजेत्या वंदना धोत्रे यांनी दोन…

Read More

विकसित भारतासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे- अविनाश धर्माधिकारी:पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४९वा स्थापना दिन ‘विकसित भारत’ संकल्पनेवर साजरा

निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘विकसित भारता’साठी प्रत्येकाच्या योगदानावर भर दिला. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या (पीएमए) ४९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शाश्वत विकास आणि भारतीय तत्त्वज्ञान हे विकसित भारताच्या निर्मितीचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. हा स्थापना दिन ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित होता. सीपीआर ऑडिटोरियम, पाषाण रोड गणेशखिंड येथे बुधवारी हा…

Read More

हरियाणवी गायक मासूम शर्मा विरोधात FIR दाखल:देहरादूनमध्ये स्टेजवरून शिवीगाळ केल्याबद्दल कारवाईची मागणी; सोशल मीडियावरही ट्रोल

डेहराडूनमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावर अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी हरियाणवी गायक मासूम शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सत्यम शिवम स्टुडंट्स युनियन (डीएव्ही कॉलेज) चे विद्यार्थी प्रतिनिधी प्रांचल नौनी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री ११ वाजता गुन्हा नोंदवला. यापूर्वी, पोलिसांनी गायकाला १५ दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगणारी नोटीस बजावली होती. दरम्यान,…

Read More

अण्णा हजारेंचे 5 जुलैचे उपोषण स्थगित:माहिती अधिकारातील बदलांना सरकारच्या स्थगितीनंतर निर्णय

माहिती अधिकार कायद्यातील (RTI) प्रस्तावित बदलांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले ५ जुलैचे नियोजित उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारने माहिती अधिकार नियमातील वादग्रस्त बदलांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर अण्णांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर हे उपोषण जरी स्थगित झाले असले, तरी अण्णा हजारे आपल्या मागण्यांवर…

Read More

काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, सर्वजण एकत्र दिसतील:वडिंग म्हणाले- चन्नी, बाजवा, रंधावा आमचे वरिष्ठ; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहुल गांधी ठरवतील

काँग्रेस हायकमांडने 2027 च्या विधानसभा निवडणुकांसाठी पंजाबमधील नेत्यांच्या भूमिका निश्चित केल्या आहेत. मात्र, यानंतर पक्षात गटबाजीच्या चर्चांनी जोर धरला. काही नेते प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांचा उघडपणे विरोध करतानाही दिसले. या अटकळांदरम्यान, राजा वडिंग यांनी गटबाजीच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, लवकरच काँग्रेसचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसतील. चरणजीत सिंग…

Read More

अपघात प्रकरणात गुन्हा दाखलसाठी मागितली लाच:3 पोलिस जाळ्यात, दहा हजारांची मागणी, 7 हजार घेताना पोलिस ठाण्याच्या आवारातच पकडले‎

अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारात . नितीन अशोक गाडगे, राजेश रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक उर्वरित पान ४ एसीबीने कारवाई करत नितीन गाडगे व दादाराम म्हस्के यांच्यावर…

Read More

मुलांना आजी-आजोबांकडे सोपवा- मोहन भागवत:मानसिक मशागतीसाठी 'गुगल बाबा'ऐवजी कौटुंबिक संस्कारांवर भर द्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुलांना मोबाईलऐवजी आजी-आजोबांकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. नागपूर येथे ‘सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या’ उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वीच्या काळी आजी-आजोबा नातवंडांना…

Read More

लोककलावंतांच्या मानधनात वाढ करा- दशरथ धुमाळ:अधिवेशनात मागण्या मांडण्याची आ. जगताप यांना विनंती‎

हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी लोककलावंतांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या मागण्या आमदारांनी मांडाव्यात, अशी विनंती धुमाळ यांनी यावेळी केली. पारंपरिक लोककलावंतांची निवड इष्टांक ५०० पाचशे करावा अशी मागणी या…

Read More