Headlines

ध्रुव राठीवर संतापली अनुपमा फेम अभिनेत्री:PM मोदींवरील विधानावर नाराजी व्यक्त केली; म्हटले – देशाला परदेशात बसलेल्या यूट्यूबरची गरज नाही

टीव्ही मालिका ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी यूट्यूबर ध्रुव राठीच्या एका पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ध्रुव राठीने 19 मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथेही जातील, तिथे त्यांना प्रत्येक ठिकाणी शरमिंदा केले पाहिजे. या विधानानंतर सहा दिवसांनी सोमवारी, भाजप नेत्या आणि अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी ध्रुव राठीवर…

Read More

एकतुनीत आढळला 8 फूट अजगर:सर्पमित्रांनी दिले जीवदान; उसाच्या फडात आढळलेल्या अजगराला जंगलात सोडले‎

पैठण तालुक्यातील एकतूनी येथे उसाच्या फडात आढळलेल्या ८ फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकतूनी येथील शेतकरी आकाश बाबासाहेब माने यांच्या उसाच्या फडात काम करत असताना अचानक ८ फूट लांबीचा विशाल अजगर दिसून आला. शेतात अजगर असल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले….

Read More

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, आचारसंहिता लागू:स्थानिक यंत्रणेत लगबग; 25 मे रोजी अधिसूचना, 18 जूनला मतदान, 22 ला निकाल

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना आता कोणत्याही नव्या विकासकामांची घोषणा करता येणार नाही. तसेच, त्यांना सरकारी वाहनांचा…

Read More

Gold Prices Surge ₹368, Silver ₹2.41 Lakh; 2026 Updates

नवी दिल्ली1 दिवसापूर्वी कॉपी लिंक सोने-चांदीच्या दरात शुक्रवारी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 4,855 रुपयांनी वाढून 2,41,013 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 9 एप्रिल रोजी तिची किंमत 2,36,158 रुपये प्रति किलो होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 368 रुपयांनी वाढून 1,50,305 रुपयांवर पोहोचले. यापूर्वी गुरुवारी त्याची किंमत…

Read More

वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला…:एकनाथ शिंदेंची गुजरातीतून भाषणाला सुरुवात; अमित शहांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या कार्याचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मगावी, गुजरातमधील वडनगर येथे भव्य ‘सेवा संकल्प अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची दमदार सुरुवात थेट अस्खलित गुजरातीतून करत उपस्थितांची मने जिंकली. “वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला बनी गया छे. आज आ…

Read More

सतेज पाटील यांच्या बदनामीकारक बॅनर्समुळे काँग्रेस आक्रमक:पुण्यात पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी

पुणे शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर असलेले बेकायदेशीर बॅनर्स लावण्यात आले आहेत. पुणे शहर काँग्रेसने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला असून, हा सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More

धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे राज्यात उभारल्या जाणार 60 ट्रॅफिक गार्डन्स:बालपणापासूनच रुजणार वाहतूक शिस्तीचे संस्कार- प्रताप सरनाईक

राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे 1 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप…

Read More

धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी एल्गार:मोर्चा शासनाच्या उरात धडकी भरवणारा ठरणार, दीपक बोऱ्हाडे यांचा दावा

धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक तीव्र करण्यासाठी येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी परभणी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शासनाच्या उरात धडकी भरविणारा ठरणार असल्याची दावा धनगर समाजाचे नेते तथा आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी शनिवारी ता. १२ हिंगोलीत पत्रकारांशी…

Read More

दरोड्याच्या तयारीतील 5 गुन्हेगारांना अटक:नागपुरात 4.82 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक साथीदार फरार

नागपूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने अटक केली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना घोरपड रोडवरील कृष्णा डेव्हलपरच्या मोकळ्या शिवारात काही संशयित घातक शस्त्रांसह दरोड्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती….

Read More

मोशी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटवणे सुरू:जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी संरचना स्थिर करण्यावर भर

मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या सुमारे आठ नागरिकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) मार्गदर्शनाखाली इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने हटवला जात आहे. जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी इमारत स्थिर करणे हे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दुर्घटनेमुळे इमारतीचा एक मोठा भाग कोसळला असून, उर्वरित संरचना अत्यंत अस्थिर अवस्थेत आहे….

Read More