Headlines

वलगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक:आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यावर भर

आगामी गणेशोत्सव, पोळा, गोकुळाष्टमी आणि ईद यांसारखे सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी वलगाव पोलीस ठाण्यात परिसरातील पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वलगाव पोलीस ठाण्याच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत गावागावांमधील कायदा व सुव्यवस्था, स्थानिक समस्या तसेच सणोत्सवाच्या काळात शांतता व सामाजिक सलोखा…

Read More

जालन्यात पर्जन्यमापक यंत्रांशी छेडछाड:बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

जालन्यामध्ये हवामान व पर्जन्यमापनात एक अत्यंत धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 49 पैकी तब्बल 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील पर्जन्यमापक उपकरणांमध्ये तब्बल चार वेळा छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात पाऊस पडलेला नसतानाही या यंत्रांवर चक्क बर्फाचे तुकडे ठेवून आणि उपकरणाच्या रिंग तोडून पावसाच्या खोट्या नोंदी दाखवण्याचा हा गंभीर…

Read More

दर्यापूर न.प. महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर:विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

दर्यापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे शिबिर पार पडले. महिला व बालकल्याण उपसभापती मंगला तराळे यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी नगरसेवक प्रदीप मलिये आणि नगरसेविका रमा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती मंगला तराळे यांनी उपस्थित महिलांना नगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या…

Read More

जायकवाडी धरणात 58 टक्के पाणीसाठा:56 हजार क्युसेक पाण्याची आवक, 9 तासांत 2 टक्क्यांनी वाढ

छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, धरणातील पाणीसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूरमधमेश्वरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. गंगापूरमधून ४९४७ क्युसेक, दारणामधून ५३३० क्युसेक, कडवामधून २३३० क्युसेक आणि पालखेडमधून १९८६ क्युसेक पाणी…

Read More

अमरावती विद्यापीठात प्लँट मेटाबोलाईट रेफरन्स स्टँडर्डस् लाँचिंग:बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) विभागातर्फे ‘प्लँट मेटाबोलाइट रेफरन्स स्टँडर्ड्स’ च्या लाँचिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता कुलगुरू कार्यालयात होणार आहे. या उपक्रमामुळे वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे प्रामुख्याने…

Read More

FSSAI Bans Misleading Energy Drink Claims; 90 Days Deadline For Labels

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जर तुम्ही थकवा घालवण्यासाठी किंवा त्वरित ताजेतवाने होण्यासाठी एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली रेडबुल, स्टिंग आणि मॉन्स्टर यांसारखी पेये पीत असाल, तर हा कंपन्यांचा दिशाभूल करणारा दावा आहे. भारताच्या अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमधून हे नाव आणि संबंधित दावे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. FSSAI ने म्हटले आहे…

Read More

ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण मनपाकडून जमीनदोस्त:सलग तिसऱ्यांदा कारवाई; दोन तासांत अनधिकृत शेड, ओटे पाडले

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी (२७ मे) निष्कासित केले. ही कारवाई सलग तिसऱ्यांदा करण्यात आली असून, नव्याने उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि ओटे जमीनदोस्त करण्यात आले. किलेअर्क परिसरातील महाविद्यालयाच्या सर्वे नंबर ३७२१ मधील जागेवर मर्दाना महाल, भूगोल विभागाची इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान आहे. या जागेवर अनेक…

Read More

अमरावती जिल्हा परिषदेच्या निविदा तीन महिन्यांपासून प्रलंबित:बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे सुशिक्षित बेरोजगार आक्रमक, सीईओकडे तक्रार

अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्वीकारलेल्या निविदा तीन महिने उलटूनही न उघडल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय ठमके यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ आणि अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या वतीने ही तक्रार…

Read More

सर्वोच्च न्यायालय पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित याचिकेवर सुनावणी करणार:म्हटले- 10वी अनुसूची संसदेने मंजूर केली, यासाठी प्रणाली तयार करणे त्यांचेच काम; नोटीस पाठवली

सर्वोच्च न्यायालय पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित याचिकेवर सुनावणीसाठी तयार झाले आहे. याचिकेत कायद्याच्या व्याख्येवर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ही याचिका ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केली आहे. सिब्बल यांनी त्या तरतुदीला आव्हान दिले आहे, जी आमदार आणि खासदारांना दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाचा दावा करून अपात्रतेपासून वाचण्याची सूट देते. सोमवारी सुनावणीदरम्यान खंडपीठाने टिप्पणी…

Read More

सातारा-महाबळेश्वर मार्गावर महाकाय दरड कोसळली:जेसीबीही दरडीत अडकला, वाहतूक पूर्णपणे ठप्प; प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

राज्यात एका बाजूला अनेक भागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा असताना, दुसऱ्या बाजूला मुंबई, कोकण, पुणे आणि सातारा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला मोठा फटका बसत असून, सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील ‘काळा कडा’ परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या भीषण घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक…

Read More