Headlines

ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण मनपाकडून जमीनदोस्त:सलग तिसऱ्यांदा कारवाई; दोन तासांत अनधिकृत शेड, ओटे पाडले

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी (२७ मे) निष्कासित केले. ही कारवाई सलग तिसऱ्यांदा करण्यात आली असून, नव्याने उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि ओटे जमीनदोस्त करण्यात आले. किलेअर्क परिसरातील महाविद्यालयाच्या सर्वे नंबर ३७२१ मधील जागेवर मर्दाना महाल, भूगोल विभागाची इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान आहे. या जागेवर अनेक…

Read More

अमरावती जिल्हा परिषदेच्या निविदा तीन महिन्यांपासून प्रलंबित:बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे सुशिक्षित बेरोजगार आक्रमक, सीईओकडे तक्रार

अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्वीकारलेल्या निविदा तीन महिने उलटूनही न उघडल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय ठमके यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ आणि अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या वतीने ही तक्रार…

Read More

सर्वोच्च न्यायालय पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित याचिकेवर सुनावणी करणार:म्हटले- 10वी अनुसूची संसदेने मंजूर केली, यासाठी प्रणाली तयार करणे त्यांचेच काम; नोटीस पाठवली

सर्वोच्च न्यायालय पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित याचिकेवर सुनावणीसाठी तयार झाले आहे. याचिकेत कायद्याच्या व्याख्येवर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ही याचिका ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केली आहे. सिब्बल यांनी त्या तरतुदीला आव्हान दिले आहे, जी आमदार आणि खासदारांना दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाचा दावा करून अपात्रतेपासून वाचण्याची सूट देते. सोमवारी सुनावणीदरम्यान खंडपीठाने टिप्पणी…

Read More

सातारा-महाबळेश्वर मार्गावर महाकाय दरड कोसळली:जेसीबीही दरडीत अडकला, वाहतूक पूर्णपणे ठप्प; प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

राज्यात एका बाजूला अनेक भागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा असताना, दुसऱ्या बाजूला मुंबई, कोकण, पुणे आणि सातारा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला मोठा फटका बसत असून, सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील ‘काळा कडा’ परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या भीषण घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक…

Read More

Maharashtra Voter List Revision 2026; Register With BLO Before Deadline

महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेला वेग आला असून, मतदारांना येत्या 8 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले गणना अर्ज भरून संबंधित बीएलओंकडे (BLO) जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केले . मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पत्रकाद्वारे मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या…

Read More

राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागात बढत्या:तब्बल 160 अधिकाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती, महसूलमंत्री बावनकुळेंचा पुढाकार

राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गतणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासह विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ‘दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक (अराजपत्रित गट-ब)’ या संवर्गातील तब्बल 160 अधिकाऱ्यांना ‘सह जिल्हा निबंधक, वर्ग-2 / सह दुय्यम निबंधक, वर्ग-2 / मुद्रांक उपअधिक्षक’ या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहांची भेट:महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ, राष्ट्रवादी शरद पवार गट NDA च्या वाटेवर? चर्चेला उधाण

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, त्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट…

Read More

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी:कामे वेगाने व दर्जेदार करण्याच्या बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचना

सातारा येथील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी 134.80 कोटी आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार तसेच परिसर विकसित करण्याच्या रक्कम रुपये 132.95 कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दोन्ही कामे वेगाने करण्यासोबतच सर्व कामे दर्जेदार करा, दर्जाबाबत कसलीही तडजोड करू नका,…

Read More

महापौर लांडगे यांच्या उपस्थितीत मेट्रो डीपीआरचे सादरीकरण:भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सुधारणा करण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा वेग लक्षात घेता, मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या गरजांसाठी नव्हे, तर पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावे, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी महामेट्रोला दिले. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, असेही त्यांनी नमूद केले. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महामेट्रोचे…

Read More

हिंगोलीतील लिगो प्रकल्पाजवळील निर्बंध लवकरच शिथिल होणार?:जिल्हाधिकारी आणि उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे निर्बंध शिथील करण्याच्या मागणीवर लिगो एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन अणुऊर्जा व संशोधन विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी सोमवारी ता. २७ दिले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लिगो प्रकल्पाच्या पार्श्वभुमीवर बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा संशोधन…

Read More