Headlines

राऊत मनकवडे नाही तर कवडीमोल…:त्यांना महाभारतापेक्षा मुघल-औरंगजेब प्रिय, परदेशात जाऊन भारताची बदनामी करणाऱ्या गांधींना जाब विचारावा- भाजप

देवेंद्र फडणवीस हवालदार आहेत की कमिशनर हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले असून म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले आहे. तुमचे नेते आणि तुम्ही हवालदारसुद्धा नाहीत. राजकारणात ‘रायंदर’ बनलेल्या संजय राऊतांनी आधी स्वतःची उंची मोजावी आणि मगच फडणवीस यांच्यावर बोलावे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे…

Read More

Rohit Pawar Ultimatum Over MPSC Exam Paper Leak Controversy

राज्यात टीईटी, पोलीस भरती आणि नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आले असतानाच, आता थेट ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (MPSC) पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा . ‘महाराष्ट्रातील पेपर लीकचा काळा अध्याय’ या नावाने पत्रकार परिषद घेत पवारांनी या कथित पेपरफुटीचे धागेदोरे, व्हॉट्सॲपवरील पुरावे आणि थेट MPSC…

Read More

पंजाबी गायकाने सांगितले – E20 पेट्रोलमुळे नवीन डिफेंडर खराब झाली:चालू असतानाच बंद पडली, कंपनीच्या लोकांनी सांगितले- फ्यूल पंप खराब झाला

पंजाबी गायक रेशम सिंग अनमोल यांनी दावा केला आहे की त्यांची नवीन डिफेंडर गाडी अचानक चालता-चालता बंद पडली. तिची पहिली सर्व्हिस झाली होती. कंपनीमध्ये जेव्हा गाडी पाठवली, तेव्हा सांगण्यात आले की खराब पेट्रोलमुळे फ्युएल पंप पूर्णपणे खराब झाला आहे. ते म्हणाले – मी सामान्य पेट्रोल (E20) भरणे बंद केले आहे. आता मी सहा-सात पंपांवर जाऊन…

Read More

सोलापूर शहरात आईची 14 वर्षांच्या मुलीसह रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या:कौटुंबिक वादातून जीवन संपवल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ एका ३३ वर्षीय महिलेने आपल्या १४ वर्षांच्या मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याची प्राथमिक माहिती नातेवाइकांनी दिली . वर्षा पांडुरंग अधटराव (३३) आणि स्वरा पांडुरंग अधटराव (१४, दोघी रा. सुशीलनगर, सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे…

Read More

मेळघाटातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली:बिजूधावडीतील 25 ते 30 विद्यार्थ्यांना तीव्र पोटदुखी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टिटंबा आश्रमशाळेतील 69 विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास झाल्यानंतर, आता बिजूधावडी आश्रमशाळेतील 25 ते 30 विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. एकापाठोपाठ दोन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. शनिवारी (दि. 25) रात्री टिटंबा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता….

Read More

कुरुंदा शिवारात चाकुचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले:3 जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वसमत ते कुरुंदा मार्गावर कुरुंदा शिवारात दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघांनी चाकुचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात रविवारी ता. 26 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता दुचाकीवरील तीन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथील विठ्ठल पुंड व त्यांचे सहकारी पुणे येथून…

Read More

संभाजीनगरातील ठाकरे स्मारकास 15 कोटी मंजूर:पालकमंत्री शिरसाट यांना दूर ठेवून उपमहापौर जंजाळ यांनी आणला निधी

सिडकोतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. स्मारकाची काही कामे अपुरी असल्यामुळे सुशोभीकरणासाठी निधीची आवश्यकता होती. त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या निधीचा शासन निर्णयदेखील निघाला…

Read More

Model Rhiya Ahir Files Cyber Complaint Against Online Harassment

दादरमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवून आंदोलनकर्त्यांच्या सुटकेची मागणी केल्यानंतर चर्चेत आलेली मॉडेल रिया आहिर हिने आता सातत्याने होत असलेल्या ऑनलाइन छळ, बदनामी आणि अश्लील ट्रोलिंगविरोधात महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आह . रिया आहिरने शनिवारी ऑनलाइन तक्रार दाखल केली असून सोमवारी सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर…

Read More

Supreme Court Hearing | Cockroach Janata Party (CJP) Parliament March Police Action NEET Protest Case

Marathi News National Supreme Court Hearing | Cockroach Janata Party (CJP) Parliament March Police Action NEET Protest Case 9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, शांततापूर्ण आंदोलन करणे हा एक संवैधानिक अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. केवळ आंदोलन किंवा निदर्शने होत असताना पोलिसांची क्रूरता किंवा कठोरता योग्य ठरवता येणार नाही….

Read More

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट:मॉडेल कॉलनीत ज्येष्ठ डॉक्टरच्या घरातून 9 लाखांचे दागिने लंपास, वसतिगृहातही चोऱ्या

पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात एका ज्येष्ठ डॉक्टरच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय मॉडेल कॉलनीतील लकाकी रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. 25 जुलै रोजी…

Read More