शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद:अनेक शेतकऱ्यांची ज्वारी घरी पडून; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते प्रकाश मारोटकर आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. बंद पडलेले खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणीनुसार निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना सादर केलेल्या…