लग्नसराईत नेवासे तालुक्यात वाहतूक कोंडी; महामार्गांवर वाहनांच्या रांगा:चाळीशी पार तापमानात नागरिक कोंडीत होरपळले
प्रतिनिधी |नेवासे तालुक्यासह परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अधिक मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहाचे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहेत. परिणामी, एकाच मुहूर्तावर शेकडो विवाह सोहळे पार पडत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते आणि मुख्य महामार्ग वाहनांनी ओसंडून वाहत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला…