Headlines

कविता जीवनाच्या विविध छटांना शब्दरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न:प्रा. डॉ. नाना भडके यांचे प्रतिपादन; संगीत, साहित्यांची जुगलबंदी‎

मन हे नेहमी शब्दांपूर्वी जन्मते आणि कविता ही त्याची सावली असते. कधी दीर्घ, कधी अल्प, पण नेहमीच अंतःकरणाशी निगडित असते. जीवनाच्या विविध छटांना शब्दांच्या रूपात व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे कविता, तसेच संगीत आणि कविता यांचा संगम म्हणजे भावनांचा एक निराळाच प्रवाह असतो. जो मनाला शुद्ध करतो, स्थिर करतो, असे विचार प्रा. डॉ. नाना…

Read More

अंजनगाव बारीत घरांचे नुकसान; वीज वाहिन्या तुटून पुरवठा खंडीत:अचानक बदललेल्या वातावरणामुळे उभ्या कांदा पिकांचे मोठे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. अचानक झालेल्या या अवकाळी बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ उडाली. विशेषतः शेतात उभ्या असलेल्या कांदा पिकांना मोठा फटका बसला असून गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी…

Read More

नवागतांचे स्वागत, प्राचार्यांचा कानमंत्र; महाविद्यालयात रंगला खास ‘दीक्षारंभ':11 जुलैपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन, सांस्कृतिक उपक्रमाची सफर‎

स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे २०२६-२७ च्या नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ करण्यात आला. दीक्षारंभ नावाने सुरु झालेल्या या नव्या शैक्षणिक सत्रात नवागतांचे स्वागत करुन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही हितोपदेश केला. महाविद्यालयाने सुरु केलेला हा दीक्षारंभ आगामी ११…

Read More

ढोरकीन, घाटनांद्रा, लोहगाव, पिशोर, खंडाळा परिसरात वरुणराजाची हजेरी:पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार‎

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकली आहे. ढोरकीन, घाटनांद्रा, लोहगाव आणि खंडाळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. २४ जून रोजी कुठे भिजपाऊस, कुठे रिमझिम, तर कुठे मध्यरात्री जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात सुखद गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे….

Read More

नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी मुद्रांक शुल्क माफ:गोदणी-लाडगावातील जमीन खरेदी सुकर, कनेक्टिव्हिटी वाढणार

हिंगणा तालुक्यातील गोदणी (रीठी) आणि लाडगाव (रीठी) येथे प्रस्तावित ‘नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट’ प्रकल्पाला राज्य सरकारने गती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जमीन संपादनाचा मार्ग सुकर होऊन प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येणार आहे. नवीन बाह्य वळण रस्त्यामुळे या भागाची…

Read More

India Mandates Health Declaration for All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched

Marathi News Business India Mandates Health Declaration For All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा पोर्टल ‘एअर सुविधा 2.0’ या नवीन नावाने पुन्हा सुरू केले आहे. आता यूएईसह जगातील कोणत्याही शहरातून भारतात येणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला विमान प्रवासाला निघण्यापूर्वी हा ऑनलाइन आरोग्य घोषणापत्र फॉर्म…

Read More

अमरावतीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन:जयस्तंभ चौकात केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने

अमरावती शहर काँग्रेस कमिटीने मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली. केंद्र सरकारने सलग चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ केल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार…

Read More

आषाढी तयारी:मागील वारीत वॉटरप्रूफ मंडपाला गळती; तरीही, मक्तेदारावर मेहरबानी का?- ढाणे

गेल्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेले काही वॉटरप्रूफ मंडप गळत होते, अरणमध्ये हाच वॉटरप्रूफ मंडप कोसळून ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. कुर्डुमध्येही तीच निकृष्ट कथा घडली…मग असं असतानाही यंदाही ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची कामे देण्यासाठी पायघड्या का अंथरल्या जात आहेत? संबंधित ठेकेदारासोबत साटंलोटं आहे का? असा ’बॉम्ब’ कुर्डुचे जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी ऐन जिल्हा परिषदेच्या…

Read More

मंदिर देणगीतून शिकतात गरीब मुले; जीवन सुधारले:सिम्बायोसिसला शिकलेले देतात धडे

महामहेश्वर मंदिर… महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या कापडणे गावातील या मंदिरात भजन, कीर्तन व धार्मिक अनुष्ठानांपेक्षा पुस्तकांच्या पानांची सळसळ जास्त ऐकू येते. सिम्बायोसिसमधून उच्च शिक्षण घेतलेल्या एका ‘योगी’ महाराजांच्या मार्गदर्शनात येथे तरुण आपले भविष्य घडवत आहेत. मंदिरातील देणगी, महाराजांना मिळणारी दक्षिणा विद्यार्थ्यांचे शिक्षण, पुस्तकांवर खर्च होते. योगी सिद्धनाथ महाराज आणि या मंदिराची देखभाल करणाऱ्या ‘श्री शेषनाथ संस्थान’चे…

Read More

सिल्लोड आगारात व्यवस्थापक म्हणून स्वाती बाखडे यांनी स्वीकारला पदभार:कर्मचाऱ्यांकडून सत्कार, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन‎

सिल्लोड आगाराच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने व्यवस्थापक पदाची धुरा सांभाळली आहे. सोमवारी स्वाती घोडे-बाखडे यांनी आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे विभागाचा वाहतूक अधीक्षक या महत्वाच्या पदाचा कारभार आहे. त्यांच्या नियुक्तीने आगारातील महिला कर्मचाऱ्यांसह संपूर्ण कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यातील एका आकस्मिक घटनेनंतर आगारातील तीन महत्वाची पदे रिक्त झाली होती. यापूर्वी वाहतूक निरीक्षक…

Read More