Headlines

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू:24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश, राधानगरी व करवीर तालुक्यात शोककळा

कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाण्यात बुडून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यापासून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी नदी आणि कॅनॉल पात्रात युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती. अखेर २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह शोधण्यात जवानांना यश…

Read More

एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा

अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत…

Read More

लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी सटाण्यात उपोषण मागे, साक्री-शिर्डी महामार्गाचे काम 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन‎

शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सोनवणे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर दुसऱ्या दिवशी यश मिळाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत अपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करण्यात येऊन २० तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. साक्री-शिर्डी महामार्गावरील सुकड नाला ते बसस्थानकापर्यंतचे काम पूर्ण…

Read More

वाकीतील महिला बचत गट 'फार्मर कप 2026' साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार

भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. कृषी यंत्रणेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वाकी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गावात नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून…

Read More

नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील ग्रामदैवतांचे घेतले दर्शन:भ्रष्टाचारमुक्तीसाठी केली प्रार्थना, विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड

शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर त्यांनी रविवारी पुण्यातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. त्यांनी श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री दत्त मंदिरात विधिवत पूजा व आरती…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात:चालकाला हृदयविकाराचा झटका आला, नियंत्रण सुटले अन् बस उलटली; प्रवाशी थोडक्यात बचावले

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज एक थरारक आणि भीषण अपघाताची घटना घडली. नाशिकहून मालेगावाकडे जाणाऱ्या एका एसटी बसच्या चालकाला गाडी चालवत असतानाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस महामार्गालगतच्या झाडावर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेमुळे एक मोठे झाड मुळासकट उन्मळून पडले असून बसचेही…

Read More

सुभाष चांडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा विशेष गौरव:30 वर्षांत 2091 मोफत हृदय शस्त्रक्रिया; लायन्सकडून काैतूक‎

३० वर्षांत २०९१ मोफत हृदय शस्त्रक्रियेसह अन्य उपक्रमकासाठी लॉ. सुभाष चांडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा लायन्स इंटरनॅशनलकडून गौरव करण्यात आला. पुणे येथे पार पडलेल्या लायन्स इंटर नॅशनलच्या बहुप्रांतिय जिल्हा ३२३४ च्या नवव्या अधिवेशनात अकोल्याचे समाजसेवक तथा लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांडक यांना बहुप्रांतिय अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. १६ व १७ मे रोजी झालेल्या…

Read More

कॉर्पोरेट जिहाद:आरोपींचे राष्ट्रीयत्व रद्द करा अन् फाशी द्या, घरावर बुलडोझर चालवा, नमाज सक्ती हिंदुस्तानात चालणार नाही- देवयानी फरांदे

नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून तपासाचा आवाका वाढत आहे. यावर बोलताना भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, असे भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी म्हटले आहे. देवयानी फरांदे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने हिंदूच्या मुलींना…

Read More

चोरी करताना पकडल्याने स्क्रू ड्रायव्हरने हल्ला:उमराणेत धाडसी प्रतिकारामुळे टळली घरफोडी; चोरटा रंगेहात जेरबंद, हल्ल्यात पिता-पुत्र जखमी‎

येथील आई मरी देवी मंदिर परिसरात पहाटेच्या शांततेत घरफोडीचा थरार रंगला. घरात चोरी करताना पकडलेल्या चोरट्याने सुटण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. मात्र, सोनवणे बंधूंनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि ग्रामस्थांच्या . आई मरी देवी मंदिराजवळ राहणारे गोरख सुरेश सोनवणे आणि त्यांचे बंधू भाऊसाहेब सोनवणे हे कुटुंबासह शेजारी राहतात. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे दोन्ही…

Read More

अभिषेक बॅनर्जींचे आव्हान- भाजपने फालतामध्ये दिग्गज उतरवावे:गुजराती टोळीला दहा जन्मही कमी पडतील; अनेक भाजप उमेदवारांनी मंदिरात पूजा केली

पश्चिम बंगालमधील फालता विधानसभा जागेवर पुन्हा मतदान करण्याच्या निर्णयानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपच्या दिग्गजांना फालतामधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘बांग्ला विरोधी गुजराती टोळी आणि त्यांचे साथीदार ज्ञानेश कुमार यांना माझ्या डायमंड हार्बर मॉडेलला नुकसान पोहोचवण्यासाठी दहा जन्मही कमी पडतील. मी केंद्र सरकारला आव्हान…

Read More