Headlines

अन्नछत्र मंडळात दररोज 100 पेक्षा जास्त चालक-वाहकांची मोफत निवासाची सोय:जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून उपक्रम सुरु‎



श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एसटी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था मोफत कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबद्दल चालक, वाहक व

.

वेंगुर्ला, लांजा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस रात्री थेट अन्नछत्र मंडळात मुक्कामी येतात. सकाळी येथूनच त्या निघतात, यामुळे भाविकांची सोय होते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळात या सर्व चालक व वाहकाची राहण्याची व महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. चालक वाहक अक्कलकोट मुक्कामी ड्युटी मागून घेत असून श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन व अन्नछत्र मंडळात महाप्रसाद घेऊन तृप्त होत आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एस टी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. सुभेदार मळा येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या साडेपाच एकरातील भव्य जागेत एस टी बस व लक्झरी वाहनासाठी मोफत वाहनतळ व जेवणाची व राहण्याची सोय केली जात आहे. एस टी बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे एवढे मोठे वाहनतळ एस टी स्टँड व्यतिरिक्त अन्नछत्र मंडळ वगळता कोठेही नसेल. स्वामी समर्थांच्या कृपाछत्राखालीच सर्व वाहक व चालक आहेत , अशा भावना आहेत.

पायाभूत सुविधांनी पर्यटनाला नवी दिशा येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून आधुनिक पायाभूत सुविधांनी पर्यटनाला एक नवी दिशा दिली आहे. हजारो भाविक दिवसभरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसाद घेतात. या महाप्रसादासोबतच न्यास विविध उपक्रम राबवित आहे.

चालक-वाहकांसाठी नियमित सोय एसटी महामंडळ व कर्मचारी यांच्या समस्या मला माहित आहेत. चालक वाहक यांच्यासाठी अद्यावत निवासस्थान व महाप्रसादाची सोय नियमित केली जाते. जनमेजयराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *