वसमत तालुक्यात थरार:मुलाचा पत्ता न सांगितल्याने वडिलांना मारहाण, दुचाकी पळवली; 9 जणांवर गुन्हा
वसमत तालुक्यातील पळशी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा पत्ता विचारण्यासाठी आलेल्या तब्बल नऊ जणांच्या टोळक्याने मुलाच्या वडिलांना बेदम मारहाण करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने घरासमोरील दुचाकीची तोडफोड करत एक दुचाकी पळवून नेली तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…