Headlines

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता ऑनलाइन:कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार

महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक…

Read More

यवतमाळमध्ये उन्हाचा कहर!:हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; 48 तासांत 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रचंड उष्णलहरींमुळे गेल्या 48 तासांत तब्बल आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचेच बळी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात…

Read More

आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले

महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे….

Read More

‘प्रहार’चा पाठपुरावा; शेतकऱ्यांना सिंचन योजनेतून मिळणार पाणी:तालुक्यात कोरडवाहू भागातील 12 गावच्या शेतकऱ्यांचा समावेश

तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना (भाग-१) मधून पूर्णपणे वगळण्यात आलेल्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून, स्वतंत्र उपसा जलसिंचन योजनेस शासनाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे वऱ्हा मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा बुद्रूक, शिवणगावसह १२ गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय देशमुख यांनी या…

Read More

उपोषण लय बेकार, हाडं ठिसूळ होतात!:सरकारने चर्चेला बोलावल्यास मार्ग काढावा; मनोज जरांगेंचा रोहित पवारांना मोलाचा सल्ला

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांचे आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच रोहित पवारांसोबत त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा देखील…

Read More

अल्लू अर्जुनची मालमत्ता म्हटल्याने अभिनेत्री संतापली:प्रायव्हेट जेटच्या फोटोवर आल्या कमेंट्स, फटकारून म्हणाली- महिला कोणाची मालमत्ता नाही

साउथ अभिनेत्री सीरत कपूर नुकत्याच तिच्यावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीवर संतापली आणि त्याला फटकारले. खरं तर, 8 मार्च रोजी साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने सीरतने त्यांच्यासोबत अभिनेत्याच्याच खासगी जेटमध्ये बसलेला एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सीरतने अल्लूला टॅगही केले होते. प्रायव्हेट जेटची ती…

Read More

मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट!:पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही हे वृत्त…

Read More

बिश्नोई गँगचा सदस्य राजस्थानमधून गजाआड:पुणे खंडणी आणि गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे पोलिसांनी मंतरवाडी गोळीबार आणि 5 कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने राजस्थानमधून कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सक्रिय सदस्याला अटक केली आहे. पवन राम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राजस्थानमधील हनुमानगड येथून पवन रामला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पुण्यातील…

Read More

विकासाचा गाजावाजा करणाऱ्यांनी पडलेला विकास पाहावा:मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिंदेंवरही साधला निशाणा

मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर…

Read More

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO:रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीवर अचानक कोसळले झाड, थोडक्यात वाचला जीव

पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झाड कोसळलं. मात्र, काळाने घाला घातला तरी वेळ आली नव्हती, याची प्रचिती या घटनेतून आली असून ही तरुणी या भयंकर दुर्घटनेतून सुदैवाने आणि सुखरूप बचावली आहे. तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण…

Read More