तुकाराम मुंढेंसारखे चांगले अधिकारी द्या, सगळे सुधारेल:चाकण एमआयडीसीवरून आदित्य ठाकरेंची मागणी, सरकारवरही साधला निशाणा
महाराष्ट्रातील हजारो कंपन्या बंद पडत असल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना, आता पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील सुमारे 20 लघुउद्योजकांनी आपल्या कंपन्यांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली कमालीची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वारंवार होणारे जीवघेणे अपघात या रोजच्या त्रासाला कंटाळून या उद्योजकांनी हा टोकाचा निर्णय…