Headlines

राम गोपाल वर्मा म्हणाले- दाऊदला श्रेय का देऊ नये:अंडरवर्ल्ड डॉनमुळे ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ बनवली, आजही कमाई करतोय

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर असे वक्तव्य केले, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. ते म्हणाले की, जर दाऊद इब्राहिम नसता, तर ते ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ सारखे चित्रपट बनवू शकले नसते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्माने अंडरवर्ल्ड आणि त्यांच्या चित्रपटांच्या संबंधांवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, त्यांनी…

Read More

आगीखेडमध्ये दिले माती परीक्षणाचे धडे:प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली शेतातून मातीचा नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत‎

शेतीमध्ये वाढता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण हा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. हेच ओळखून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आगीखेड (ता. बार्शीटाकळी) येथील शेतकऱ्यांना माती परीक्षण आणि त्यानुसार खत व्यवस्थापन कसे करावे, याचे मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे….

Read More

दहावी परीक्षेमध्ये ज्ञानसंपदा शाळेचा ध्रुव गायकवाड प्रथम:गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील ज्ञानसंपदा शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षीच्या निकालात गायकवाड ध्रुव याने ९७.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण मिळवले. वेदांत बर्वे याने ९६.२% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषभ वांडेकर याने ९६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक…

Read More

केळीच्या फळबाग मस्टरवर स्वाक्षरीसाठी 5 हजारांची लाच:औंढा नागनाथमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात!

औंढा नागनाथ तालुक्यातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतीमध्ये फळबागाच्या मस्टरवर स्वाक्षरीकरून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी पाच हजाराची लाच घेतांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. १८ औंढानागनाथ येथे सायंकाळी रंगेहात पकडले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील एका…

Read More

चुलत भावाच्या कुटुंबाची प्रगती सहन झाली नाही:रागात जंगलात नेऊन भोसकले, त्याच्याच फोनवरून मागितली खंडणी‎

चुलत भावाचा खून करून मृतदेह जंगलात‎फेकून दिला, त्यानंतर तो बेपत्ता असल्याचे‎‎भासवण्यासाठी मृताच्याच‎‎मोबाइलवरून त्याच्या‎‎वडिलांना मेसेज करून‎‎पैशांची मागणी केली‎‎आणि स्वतःच पोलिस‎‎ठाण्यात जाऊन तो‎‎हरवल्याची तक्रार दिली.‎‎अत्यंत थंड डोक्याने कट‎रचून केलेला या गुन्ह्याचा सिडको पोलिसांनी‎पर्दाफाश केला आहे. अपहरणाचा बनाव‎रचणाऱ्या आरोपी चुलत भावाला मोबाइल‎लोकेशनच्या आधारे गजाआड करण्यात आले‎आहे. राजू रामू बनसोड (२५, रा. पाथ्री, ता.‎फुलंब्री) असे मृताचे नाव असून आरोपी…

Read More

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट:8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांचे धक्कादायक दावे; बनावट खाती की मोठा घोटाळा?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी गती वाढवली असून, या प्रकरणात संशयित म्हणून समोर आलेल्या प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी आठ तास चौकशी केली. या दीर्घ चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी अनेक महत्त्वाचे दावे केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी कधीही समता पतसंस्थेत खाते उघडले नाही किंवा त्या संस्थेत गेल्याच नाहीत. तसेच त्यांच्या…

Read More

कॉरिडॉर विरोध:मुख्यमंत्र्यांना आषाढीला दाखवणार काळे झेंडे, मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दिला इशारा‎

गेल्या चार वर्षांपासून कॉरिडॉरबाबत आम्हाला विश्वासात घेणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, एकही आमदार किंवा मंत्री भेट देत नसल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला जाणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांनी दिली. या विषयी येथील पश्चिम द्वार व्यापाऱ्यांनी विशेष बैठक घेत आपला हा…

Read More

Ranveer Singh Don 3 Controversy

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘डॉन 3’ चित्रपटाच्या वादामध्ये, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी हिंदी रशला सांगितले की, अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात असहकार (नॉन-कोऑपरेशन) निर्देश जारी करण्यापूर्वी त्यांनी रणवीर आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांचे व्हॉट्सॲप चॅट्स स्वतः वाचले होते. रणवीरने सर्व काही…

Read More

मान्सून महाराष्ट्रात दाखल:दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा 5 दिवसांचा अंदाज

तमाम महाराष्ट्रवासीयांसाठी एक आनंदाची बातमी. ज्याची वाट आपण चातक चोचीने पाहत होता, तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय. गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस…

Read More

पुण्यात 67,956 थकबाकीदारांनी अभय योजना धुडकावली:सजग नागरिक मंचाचा सवाल, महापालिका प्रशासनावर कारवाईचा दबाव

पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबवण्यात आलेल्या अभय योजनेला हजारो सराईत थकबाकीदारांनी धुडकावून लावल्याचे समोर आले आहे. एकूण ६७,९५६ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. या पार्श्वभूमीवर, अशा थकबाकीदारांवर महापालिका प्रशासन नेमकी कधी आणि कोणती कारवाई करणार, असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च…

Read More