देवगाव रंगारी ते गल्लेबोरगाव राज्य मार्गाची दुरवस्था:वाहनधारक त्रस्त, 6 किमी प्रवासाला लागतोय 40 मिनिटांचा वेळ, विद्यार्थ्यांचे हाल
कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील थेट अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी ओळख असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३९ म्हणजेच अमळनेर-नाग द-कन्नड-गल ्लेबोरगाव-देवगाव रंगारी-लासूर स्टेशन ते कायगाव टोका हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. गेल्या १५ ते…