Headlines

देवगाव रंगारी ते गल्लेबोरगाव राज्य मार्गाची दुरवस्था:वाहनधारक त्रस्त, 6 किमी प्रवासाला लागतोय 40 मिनिटांचा वेळ, विद्यार्थ्यांचे हाल‎




कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील थेट अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी ओळख असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३९ म्हणजेच अमळनेर-नाग द-कन्नड-गल ्लेबोरगाव-देवगाव रंगारी-लासूर स्टेशन ते कायगाव टोका हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून या महामार्गाचे काम पूर्णपणे थंड बस्त्यात असून, केवळ आश्वासनापलीकडे प्रशासनाने स्थानिकांच्या पदरात काहीच पाडले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी मजूर आणि रोज प्रवास करणारे नोकरदार वर्गाचे कमालीचे हाल होत आहेत. मुख्य म्हणजे देवगाव रंगारी ते देवळाना या अवघ्या ६ किलोमीटरच्या अंतरासाठी ३५ ते ४० मिनिटांचा वेळ लागत आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक शाळकरी मुले, दुचाकीस्वार आणि शेतकरी कोसळून गंभीर जखमी होत आहेत. या रस्त्याच्या अशा दुरवस्थेचा सर्वात जास्त फटका कन्नड व खुलताबाद तालुक्यातील ७५ ते ८० खेड्यांमधील शेतकरी बांधवांना बसत आहे. शेतकरी आपला कापूस, ऊस, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, गहू यांसारखा शेतमाल लासूर स्टेशन, कन्नड, तसेच पुणे, मध्य प्रदेश, गुजरात या बाजारपेठेत किंवा बाजार समितीला पाठवण्यासाठी याच मुख्य रस्त्याचा वापर करतात. मात्र, आजूबाजूच्या शेतातील पाणी थेट रस्त्यावर आल्याने रस्ता पूर्णपणे उखडला असून खड्डे पडले आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून या रस्त्याबाबत केवळ शासकीय पातळीवर प्रस्ताव पाठवणे, कागदपत्रांची जुळवाजुळव, मंजुरी आणि खोट्या घोषणांचा खेळ सुरू आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केवळ निवेदने आणि आंदोलनांचे फार्स केले, परंतु प्रशासनाने दरवेळी आश्वासनेच दिली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून या महामार्गाचे काम पूर्णपणे थंड बस्त्यात असून, केवळ आश्वासनापलीकडे प्रशासनाने स्थानिकांच्या पदरात काहीच पाडले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी मजूर आणि रोज प्रवास करणारे नोकरदार वर्गाचे कमालीचे हाल होत आहेत. मंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू या रस्त्याविषयीची संपूर्ण माहिती मी घेतली असून, लवकरच या रस्त्याशी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व मंत्रिमहोदयांना भेटून या रस्त्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण कसे होईल, यासाठी मी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संजय गव्हाणे यांनी सांगितले. तर मी देवगाव रंगारी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे. परिसरातून आमचा शेतमाल बाजारपेठेत किंवा घरी नेताना रस्त्याअभावी त्रास होतो. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटण्याची सतत भीती असल्याचे देवगाव रंगारी येथील शेतकरी साहेबराव गोरे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *