Headlines

फुलंब्री येथील पेट्रोल पंपासमोर कार, दुचाकीच्या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू:पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वळत असताना भरधाव कारने दिली जोराची धडक‎



छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर फुलंब्री येथील मानकापे पेट्रोल पंपासमोर कार आणि दुचाकीच्या अपघातात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. सुमित गजानन डकले (रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) असे म

.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित हा आपल्या आईला दुचाकीवरून (एमएच २० सीके ८१२१) ने घेऊन फुलंब्री येथे आला होता. आईला उतरवून तो महामार्गावरील मानकापे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वळत होता. याच वेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (एमएच १२ वायडी ५१००) जोरदार धडक झाली. अपघातानंतर जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक अमोल बनकर यांनी तत्परता दाखवली. त्यांनी जखमी सुमितला तातडीने फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, आजी आणि भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मृत सुमित हा पोलिस भरतीची तयारी करत होता.

पोलिस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे फुलंब्री नगरपंचायत हद्दीत महामार्गाच्या दुभाजकावर सुशोभीकरणासाठी विविध झाडे आणि झुडपे लावण्यात आली आहेत. मात्र, हीच झाडे आता वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. दरम्यान, सुमित हा पोलिस भरतीची तयारी करीत होता. मात्र, या अपघातामुळे त्याचे स्वप्न अधुरे राहिले असून, त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *