Headlines

24 तासांत कारवाई:महिलेवर अत्याचार; डॉक्टर,‎भाजप शहराध्यक्षाला अटक‎, फुलंब्रीत उपचारासाठी आली होती महिला‎




उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर ‎‎अत्याचार करून व्हिडिओ सोशल ‎‎‎मीडियावर प्रसारित ‎‎‎केल्याच्या प्रकरणात ‎‎‎फुलंब्री पोलिसांनी २४ ‎‎‎तासांच्या आत कारवाई ‎‎‎केली आहे. याप्रकरणी‎‎ डॉ. रामदास महादू तरटे‎‎(५४) आणि भाजपचे ‎‎फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम‎‎ भागाजी ढोके (५४) या‎‎ दोघांना अटक करण्यात‎‎ आली असून‎‎ न्यायालयाने त्यांना दोन ‎‎दिवसांची पोलिस कोठडी ‎‎सुनावली आहे.‎ ‎पीडित महिलेने २०‎ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ फुलंब्री येथील समर्थ क्लिनिकमध्ये ‎डोकेदुखीच्या उपचारासाठी दिलेल्या ‎गोळ्यांमुळे गुंगीच्या अवस्थेत असताना ‎तिच्यावर अत्याचार करण्यात आला.‎तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवून तो ‎प्रसारित करून बदनामी करण्यात आली.‎या तक्रारीवरून फुलंब्री पोलिसांनी दोन्ही ‎आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह ‎ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल ‎केला आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश‎ जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक ‎प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली‎‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा ‎नागरे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक डॉ.‎सोनाली पाईकराव, पोलिस उपनिरीक्षक ‎सुग्रीव चाटे, अंमलदार अनिल शिंदे,‎ दिनकर पांढरे व कौतिक चव्हाण यांनी ही‎ कारवाई पार पाडली. या प्रकरणाचा पुढील ‎तपास उपविभागीय पोलिस अधिकारी ‎पूजा नागरे करत आहेत. तपासादरम्यान ‎घटनेशी संबंधित पुरावे, डिजिटल ‎स्वरूपातील माहिती आणि इतर आनुषंगिक बाबींची नियमानुसार‎ पडताळणी करण्यात येत आहे.‎ पीडितेला त्वरित न्याय व आरोपींना कठोर शिक्षा द्या‎ डॉक्टरांसारख्या पवित्र पेशाला आणि लोकप्रतिनिधीसारख्या जबाबदार पदाला काळिमा‎ फासणारी फुलंब्रीतील ही घटना अत्यंत भयानक आणि संतापजनक आहे. पीडित‎ महिलेवर झालेला अत्याचार आणि व्हिडिओ व्हायरल करून केलेली बदनामी‎ मानवतेला कलंकित करणारी आहे. पोलिसांनी २४ तासांत अटक केली असली तरी या ‎नराधमांना कठोर शिक्षा देऊन पीडितेला त्वरित न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी‎ नागरिकांतून होत आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *