Headlines

टाकळी अंबड, घेवरीच्या नागरिकांना आता मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी, आरओ फिल्टरचे जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते लोकार्पण‎




नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रोकोनाव्हिस कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड व विलास बापू भुमरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी अंबड आणि घेवरी येथे सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या दोन आरओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच प्रवाह परिवारातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी एक एलइडी टीव्हीदेखील भेट देण्यात आला. यावेळी शिरीष नरके, माऊली नरके, भीमराव वाकडे, शरद नरके, दत्तात्रेय वाकडे, सुनील घायताडक, अमोल नरके, प्रशांत नरके, ब्रह्मदेव नरके, संभाजी नरके, एकनाथ काळे, संतोष नरके, बाबासाहेब नरके, भाऊसाहेब नरके, महादेव नरके, राजेंद्र नरके, भिवराज खडके, मनोज नरके, किशोर वाकडे, गजानन गोर्डे, काकासाहेब वाकडे, राहुल नरके, संभाजी नरके, राम वैद्य, उद्धव क्षीरसागर, सोहेल शेख, दादा निकाळजे, सिद्धार्थ नरके, अमोल नलावडे आदी उपस्थित होते. नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल शिवराज भुमरे म्हणाले, या फिल्टर प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना याचा मोठा लाभ मिळेल. हे फिल्टर प्लॅंट गावात आणण्यासाठी प्रदीप भास्करराव नरके व रणजित नरके यांनी विशेष परिश्रम घेत सतत पाठपुरावा केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *