चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या:सासर्यालाही फोनवरून दिली धमकी, नांदेडमधील धक्कादायक घटना; आरोपी पती फरार
तू काकाला का बोलली म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कठ्यातून गोळ्या झाडल्या. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी येथे सोमवारी मध्यरात्री हा गोळीबाराचा थरार घडला. पत्नीला गोळ्या घातल्यानंतर आरोपीने सासर्याला फोन करून ‘ तुझ्या पोरीला गोळ्या घातल्यात आता तुझ्याकडे येतो.’ अशी धमकी…