Headlines

11 राज्यांमध्ये तापमान 40-47°C:यूपीतील बांदा 47.6°C; बिहारमध्ये वीज पडून 4 जणांचा मृत्यू; काश्मीर-उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी

देशाला पुढील 2 दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शुक्रवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 40°C ते 47°C दरम्यान होते. सर्वाधिक 47.6°C उत्तर प्रदेशातील बांदा येथे आणि 46.8°C मध्य प्रदेशातील नौगाव येथे नोंदवले गेले. हवामान विभागाने या 11 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा जारी केला आहे. दरम्यान,…

Read More

Bajaj Pulsar N125 Discontinued in India

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात दोन वर्षेही पूर्ण करू शकली नाही. कंपनीने देशातील डीलर्सना तिचा पुरवठा बंद केला आहे. कमी विक्रीमुळे कंपनीने तिला भारतीय बाजारातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. बजाज ऑटोचा इतिहास आहे की ज्या बाईक्स…

Read More

आजपासून पावसाळी अधिवेशन:विरोधकांची कल्पकता संपली; एआयनिर्मित पत्र दिले : मुख्यमंत्री; विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी : शिंदे

पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. फडणवीस म्हणाले, तीन आठवड्यांचे पूर्ण अधिवेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न…

Read More

कामाच्या जोरावरच निवडणुका जिंका, ठाकरे यांचा नगराध्यक्षा भिसेंना सल्ला:कुर्डुवाडीची सत्ता राखल्याबद्दल डिकोळेंसह कार्यकर्त्यांचे मातोश्रीवर कौतुक‎

कुर्डूवाडी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकवल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी कुर्डूवाडीत सत्ता राखल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत आगामी काळासाठी ‘कामाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा’ मोलाचा सल्ला दिला. केवळ विजयाचे अभिनंदन करून न थांबता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माढा…

Read More

ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंतांची मोठी भूमिका?:ओमराजेंना पुण्यातून चार्टर्डने दिल्लीला नेल्याचा सुषमा अंधारेंचा दावा

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर दावा करत, ओमराजे निंबाळकर यांना पुण्यातून दिल्लीला नेण्यासाठी आमदार तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण घडामोडींची तयारी…

Read More

कर्जत-जामखेडला अखंडित वीज द्या:प्रा. राम शिंदे यांचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश, महावितरणचा घेतला समाचार

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व…

Read More

अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना 'टीईटी'तून सूट:हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश, आदेश डावलणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असण्याची अट अनिवार्य नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या निकालामुळे राज्यभरातील अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण अधिकाऱ्यांनी ‘टीईटी’ पात्रतेअभावी नाकारलेले शालार्थ आयडी आणि पदमान्यतेचे प्रस्ताव आता पुन्हा विचाराधीन घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सय्यद अबू…

Read More

अशोक खरात प्रकरण उघड झाल्याबद्दल शिंदेंचे आभार मानले पाहिजे:तपास का होतोय? प्रा. श्याम मानव यांनी मांडले धक्कादायक तर्क

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत स्फोटक दावे केले आहेत. “हे प्रकरण आज घरोघरी पोहोचले कारण याचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले आहेत. हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा नसता आणि रूपाली चाकणकर यांची त्याच्यावर भक्ती नसती, तर कदाचित…

Read More

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संतापजनक प्रकार:दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट; संबंधितांवर कारवाईची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. यामुळे धार्मिक स्थळी अशा वस्तू आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे….

Read More

हरिद्वारच्या व्हीआयपी घाटावर अश्लील नृत्य, व्हिडिओ:किसान महाकुंभात डान्सरने लावले ठुमके, धार्मिक संघटनांचा आक्षेप

धर्मनगरी हरिद्वारमध्ये हर की पैडीसमोर असलेल्या व्हीआयपी घाटावर भारतीय किसान युनियन क्रांतीच्या किसान महाकुंभातून महिला नृत्यांगनेने फिल्मी गाण्यांवर नृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक नृत्यांगनेवर नोटा उडवताना आणि स्टेजसमोर नाचतानाही दिसत आहेत. यामुळे धार्मिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक मर्यादांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि धार्मिक संघटनांनी यावर आक्षेप…

Read More