Headlines

संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-2026 ची घोषणा:जीव वाचवणाऱ्यांचा हेल्प रायडर्सतर्फे सन्मान होणार




हेल्प रायडर्स संस्थेने ‘संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६’ ची घोषणा केली आहे. मानवतेची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पुढाकार घेतलेल्या हेल्प रायडर्स संस्थेने समाजात एक सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे आणि इतर आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे. या कार्यामुळे अनेक जीव वाचले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली आहे. कोरोना काळात प्लाझ्मा, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू पुरवून संस्थेने अनेकांचे प्राण वाचवले. तसेच पूरग्रस्त भागात मदतकार्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या संस्थेचे कार्य विविध शहरांमध्ये विस्तारले असून शेकडो स्वयंसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत कनोजिया म्हणाले की, समाजात जीव वाचवण्याच्या कार्यात योगदान देणारे, अपघातग्रस्तांना मदत करणारे किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा. महाराष्ट्रासह देशभरातील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या कार्याची नोंद संस्थेकडे करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६’ सोहळ्याचे आयोजन पुण्यात शनिवार, ६ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे. या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी ९९७०२३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या पत्रकार परिषदेला हेल्प रायडर्सचे समन्वयक अनुपम शहा, बाळासाहेब ढमाले आणि श्रीकांत कापसे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *