जि.प.च्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन:बदलीनंतरही जनगणना जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश
जिल्हा परिषद अमरावतीच्या शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त विषय शिक्षक समायोजन प्रक्रिया जिल्हा परिषदेमधील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांध यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेअंती ४५ पैकी ४४ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. ही प्रक्रिया नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध वातावरणात पुढे गेली. या समायोजन प्रक्रियेमध्ये विषय शिक्षक भाषा (मराठी माध्यम)…