बाल विकास कार्यालयातील आगप्रकरणी चौकशी करावी:माकपची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
येथील पंचायत समिती एकात्मिक बाल विकास कार्यालयाला (आयसीडीएस) ८ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत लाडकी बहीण, लेक लाडकी योजनांचे हजारो अर्ज, पोषण आहार, बेबी किट्स व अंगणवाडी सेविकांच्या नोंदवह्या जळून खाक झाल्या. कार्यालयामार्फत विविध योजनांतील अर्जसुद्धा जळाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयास्पद बाब म्हणजे आगीच्या दोन दिवस आधीच…