Headlines

लोक सहभागातून शहरात रस्ता दुभाजकात हजार वृक्ष लागवड:आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत उद्घाटन‎




हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर घडविण्याच्या उद्देशाने वाडिया पार्क-टिळक रोड मार्गावरील दुभाजकांमध्ये लोकसहभागातून एक हजार बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना भविष्यात विविध रंगांची फुले येणार असल्याने संपूर्ण टिळक रोड परिसर आकर्षक आणि नयनरम्य होणार असून शहराच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे, उपक्रमाचे प्रमुख संयोजक गोरख पडोळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, वैभव जगताप, चैतन्य घुले, संयम शेटीया, संजय कडूस उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, शहरातील डीपी रस्त्यांचे काँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून वाडिया पार्क-टिळक रोड हा त्यातील महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर दुभाजकात बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. काही वर्षांत हा संपूर्ण रस्ता विविध रंगांच्या फुलांनी बहरलेला दिसेल. लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि महानगरांप्रमाणे वाढणारे श्वसनाचे आजार ही चिंतेची बाब आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे वृक्षसंवर्धन हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पडोळे म्हणाले, वाडिया पार्क-टिळक रोड हा शहरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या पूर्णपणे दूर झाली आहे. पूर्वी स्वस्तिक चौक परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत होते. आता हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. गोरख पडोळे यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून एक हजार बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली असून ही झाडे केवळ लावून न थांबता त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही सर्व नागरिक मिळून पार पाडू, असा निर्धार उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. वृक्षांचे संवर्धनाची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारली पर्यावरण संवर्धनासाठी परिसरातील नागरिकांना एकत्र करून रस्ता दुभाजकात एक हजार बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारली आहे. बोगनवेलच्या विविध रंगांच्या फुलांमुळे हा रस्ता भविष्यात शहरातील ‘मॉडेल रोड’ म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *