![]()
विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या अखंड गजरात पैठण ते पंढरपूर दरम्यानचा सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास करत पायी दिंडी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, धाराशिव असा चार जिल्ह्यातून मार्गक्रमण करत रविवारी दु. १२ वा. मुंगशी या गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या वैष्णवांच्या मेळ्याचे स्वागत करण्यासाठी मुंगशी आणि परिसरातील भाविक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्याची सीमा ओलांडून हा दिंडी सोहळा माढा तालुक्यात प्रवेश करत असल्याने, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हरिनामाच्या जयघोषाने आणि ‘ज्ञानोबा- तुकाराम’, ‘माऊली- विठ्ठल’च्या अभंगवाणीने संपूर्ण मुंगशी परिसर दुमदुमू लागली आहे. मुंगशी येथील प्रवेशानंतर माढा येथे पालखी मुक्काम होणार असून वारकऱ्यांच्या विसाव्याची, भोजनाची आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी स्थानिक मंडळांनी व ग्रामस्थांनी चोख व्यवस्था केली आहे. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचे सोलापूर जिल्ह्यात मुंगशी येथे प्रवेश करतेवेळी उपविभागीय अधिकारी जयश्री अव्हाड, तहसीलदार संजय भोसले यांच्या हस्ते पालखीचे स्वागत होणार आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून त्यासाठी ४ अधिकारी, २० अंमलदार व २५ होमगार्डची नियुक्ती करण्यात आली. तसेच आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, सेवक व सेविका, आशा स्वयंसेविका, औषध निर्माण अधिकारी व परिचर यांचीही नियुक्ती करण्यात आली. एकूण अंतर: सुमारे २५० किलोमीटरचा पायी प्रवास. प्रवेश मार्ग: पैठणवरून निघालेला हा सोहळा धाराशिव जिल्ह्यातून प्रवास करत आज सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दाखल होत आहे. वेळ आणि स्थान: आज रविवारी दुपारी ठीक १२:०० वाजता मुंगशी (ता. माढा) येथे आगमन. दिंडी सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये
Source link
संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा:जिल्ह्यात मुंगशीत प्रवेश, बिटरगावात मुक्काम, प्रशासन अन् पोलिस यंत्रणा सज्ज