ऊस गळीत हंगामापूर्वी शंभूराज देसाईंची मोठी मागणी:साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचे अनुदान द्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्रासह साखर उद्योगासमोरही अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पावसाअभावी अनेक भागांतील ऊस पिकावर परिणाम झाला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत आगामी ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना प्रतिटन 750 रुपयांचे…