नाशिकला प्रेयसीचा खून करत प्रियकराने केली आत्महत्या:संशयित साहिल लव्हारेचे यवतमाळवरून येत कृत्य
यवतमाळमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या गळ्यावर चाकूने वार करत निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियकरानेही जॉगिंग ट्रॅकवर झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे शनिवारी पहाटे उघडकीस आले. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० वाजता वैष्णवी आवारे हिचा खून झाल्याचा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्या युवकासोबत…