Headlines

मराठवाड्याच्या हक्काचे 255 टीएमसी पाणी विनाविलंब द्या:मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीची मागणी, संभाजीनगर येथे बैठक घेणार

मराठवाड्याच्या हक्काचे एकूण मंजूर 255 टीएमसी पाणी विनाविलंब मिळावे तसेच प्रकल्पांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीने शनिवारी ता. 3 हिंगोली येथील बैठकीत करण्यात आली आहे. या मागणीसाठी मराठवाडास्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेतली जाणार आहे. हिंगोली येथे माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या् अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी…

Read More

मतदार यादीतील हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ:बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार, नोटीसधारकांना दिलासा

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे…

Read More

म्युल बँक खात्यांद्वारे पावणेदोन कोटींची फसवणूक:देशभरातील 19 नागरिकांना गंडा, पाच जणांना अटक

नागरिकांच्या नावावर बँक खाती उघडून त्यांचा ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. देशभरातील १९ नागरिकांची एकूण एक कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. श्रवण अंकुशे (वय २५), हरिओम हरिराम साहू (वय २४), सौद शेख (वय २३), साहील…

Read More

पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्त:उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्णय; अंतर्गत वादामुळे कामकाजावर परिणाम

पुण्यातील ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ हे स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ असून; ट्रस्टमधील अंतर्गत वादामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला होता. परिणामी या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी बी. थिलागावती यांची अध्यक्षपदी झालेली निवड कायदेशीरदृष्ट्या वादात सापडली होती. या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप…

Read More

सलमान खानच्या ‘मातृभूमी’ला सरकारकडून NOC:CBFCची मंजुरी बाकी, भारत-चीन संबंध लक्षात घेऊन चित्रपटात अनेक बदल, जाणून घ्या का रखडला

सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाला सरकारकडून NOC मिळाली आहे. आता चित्रपटाला CBFCच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. भारत-चीनदरम्यान २०२० मध्ये झालेल्या संघर्षावर आधारित या चित्रपटात अनेक बदल करण्यात आले आहेत. कोणत्याही देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये, याची सरकारने खात्री केली आहे. वृत्तांनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला (IB Ministry) निर्मात्यांनी दिलेल्या ‘मातृभूमी’च्या नव्या आवृत्तीबाबत कोणतीही हरकत नाही. यानंतर या…

Read More

औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद:तब्बल 193 कोटींचा मास्टरप्लॅन आणि अचानक मोठा निर्णय; नित्यपूजा राहणार सुरू

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 वे स्थान असणाऱ्या श्री नागनाथ मंदिरातील अंतर्गत कामे व विकास आराखड्यातील दुरुस्ती वेगाने पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून, म्हणजेच 5 October पासून मंदिर परिसर 1 महिन्यासाठी भाविकांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्री नागनाथ संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी…

Read More

पालकमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा केवळ दिखावा?:भंडाऱ्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांशी संवाद न साधल्याचा आरोप

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यानंतर आज पालकमंत्री पंकज भोयर यांनी या भागाचा पाहणी दौरा केला. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश देणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, या दौऱ्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे हा दौरा नेमका शेतकऱ्यांच्या…

Read More

गोकुळच्या मल्टिस्टेटसाठी 200 कोटींची ऑफर?:इतक्या वर्षांनी निवडणुकीच्या तोंडावर राळ का उडवताय?; हसन मुश्रीफांचा महादेव जानकरांना टोला

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. “गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट’ करण्यासाठी मला तत्कालीन काळात तब्बल 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मी या कोट्यवधींच्या आमिषाला लाथ मारली,” असा खळबळजनक दावा…

Read More

जातिनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटना एकवटल्या:11 ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय बैठक, विजय वडेट्टीवारांचा पुढाकार

जातिनिहाय जनगणनेच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी देशभरातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय बैठक येत्या 11 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत देशभरातील विविध ओबीसी संघटनांचे सुमारे 150 प्रतिनिधी सहभागी होणार असून, जातिनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे विविध प्रश्न आणि आगामी आंदोलनाची रुपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात…

Read More

विमानात प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली:'डॉक्टर' भागवत कराड तातडीने मदतीला धावले, विमानातील ऑक्सीजन देत केली प्रकृती स्थिर

दिल्लीहून मिझोरमची राजधानी आइजोलकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली. मात्र, याच विमानातून प्रवास करत असलेले माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न लावता एका ‘डॉक्टर’ची भूमिका बजावली आणि प्रवाशावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भागवत कराड हे मिझोरम दौऱ्यासाठी दिल्लीवरून इंडिगोच्या (6E 291) विमानाने आइजोलकडे…

Read More