Headlines

पाकिस्तानमध्ये महागाई दर 11% पर्यंत जाऊ शकतो:डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 298 पर्यंत पोहोचू शकतो; कारण- कच्च्या तेलाची वाढती किंमत

मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि वाढत्या तेल संकटामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढणार आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्या, तर पाकिस्तानमधील महागाई दर पुन्हा एकदा दुहेरी आकडा ओलांडून 11% पर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 298 पर्यंत जाऊ शकते. डॉन आणि टॉपलाइन सिक्युरिटीज लिमिटेडच्या पाकिस्तान स्ट्रॅटेजी रिपोर्टमध्ये ही माहिती…

Read More

भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई:सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना केला रद्द; खराब आर्थिक असल्याचे आले निदर्शनास

भारतीय रिझर्व्ह बँकेने अपुरे भांडवल, उत्पन्नाची कमी शक्यता आणि बँकिंग नियामक कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. या निर्णयामुळे बँकेचा सर्व बँकिंग व्यवहार आजपासून तात्काळ प्रभावाने बंद झाला असून, महाराष्ट्र सहकारी आयुक्त आणि संस्था निबंधकांना बँकेच्या समापनाची प्रक्रिया सुरू करून लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती आरबीआयने केली आहे….

Read More

आरोग्य विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:‘अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, पण आम्हाला सहआरोपी करू नका’

अल्पवयीन मातांची धक्कादायक प्रकरणे उघडकीस आली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. याविषयी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका आरोग्य विभागाने आम्ही अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, मात्र आमची सुरक्षा होणे गरजेचे आहे. तसेच आम्हाला सहआरोपी करू नका, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेच्या दवाखान्यात वर्षभरात ८६ अल्पवयीन माता…

Read More

राहुल गांधींविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश:ब्रिटिश नागरिकत्वाचा आरोप, अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले- CBI चौकशी करावी

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीशांनी सांगितले की, एफआयआर (FIR) दाखल करून हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) हस्तांतरित करावे. कर्नाटक भाजपचे कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांनी राहुल गांधींवर ब्रिटिश नागरिकत्व घेतल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने सीबीआयला (CBI)…

Read More

तिवसा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर:कान, नाक, घसा, दमा आणि नेत्रविकारांची तपासणी

तिवसा येथील गौरखेडेपुरा येथील आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. या शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान, नाक आणि घसा यांसारख्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या तपासणीदरम्यान मोतीबिंदू, काचबिंदू आणि इतर नेत्रदोषांविषयी माहिती देण्यात आली. काही रुग्णांची…

Read More

संघर्ष करा म्हणणाऱ्यांनाच सवाल; नवनीत राणांची पोस्ट चर्चेत:सोबत आहात तर संघर्ष कशासाठी? भाजपमधील नाराजी उफाळली?

अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतरही त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी सक्रिय प्रचार केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत मतभेद, राज्यसभेची संधी न मिळाल्याची खंत या मुद्द्यांवर त्यांनी थेट भाष्य केले नसले तरी त्यांच्या समाज माध्यमांवरील…

Read More

ISI शी संबंधित दहशतवादी मॉड्यूलच्या आणखी पाच आरोपींना अटक:पाकिस्तानच्या ISI हँडलर शहजाद भट्टीशी जोडलेले होते नेटवर्क, आतापर्यंत 12 जणांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI शी संबंधित दहशतवादी मॉड्यूलच्या आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी मंगळवारी या मॉड्यूलच्या इतर ७ सदस्यांना अटक करण्यात आली होती. अशा प्रकारे दहशतवादी मॉड्यूलच्या आतापर्यंत १२ सदस्यांना अटक करण्यात आली आहे, तर एक फरार आहे. दिल्ली पोलिसांनुसार, हे नेटवर्क पाकिस्तानमधील ISI हँडलर शहजाद भट्टीशी संबंधित होते….

Read More

राजकारणात मोठा धक्का:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन; बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या संवादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असताना ही निवडणूक बिनविरोध…

Read More

लोहगडवरील हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा:14 जूनलाही झाला होता केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न! वडिलांचे गंभीर आरोप

लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने…

Read More

210 साखर कारखान्यांकडून 1036 लाख टन ऊसाचे गाळप:'विस्मा'ची साखर-जैवऊर्जा परिषद पुण्यात, उत्कृष्ट कारखान्यांचा सन्मान

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने शनिवारी (३० मे) पुणे येथे साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विशेष उल्लेखनीय काम केलेल्या साखर कारखान्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब…

Read More