योगा अभ्यासातून निरोगी जीवनाचा संकल्प करावा:ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे प्रतिपादन, विविध योगासनांचा सराव करुन घेतला
धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योगाभ्यासातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भारवी कला अकादमी, जय गजानन योगा ग्रुप व वाघामाता योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…